अखेर शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली दखल

प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिला होता धरणे आंदोलनाचा इशारा

कल्याण : ठाणे जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवरील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. प्रलंबित प्रकरणे निकाली काढले नाही तर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. ह्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित विषयाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आढावा सभा घेऊन लवकरात लवकर प्रकरणांचा निपटारा करण्याचे त्यांना सांगितले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ठाणे जिल्हा  पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा  आयोजित करून केलेल्या कामांची अधिकृत माहिती दिली जाईल म्हणून आपण धरणे आंदोलन करू नये असे लेखी स्वरूपात शिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले असल्याने १४ डिसेंबर रोजी होणारे धरणे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील संस्था, शाळा तसेच शिक्षक-शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांची  वैयक्तिक  काही प्रकरणे  शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत. संघटनेचे पदाधिकारी गुलाबराव पाटील, आर डी पाटील, एकनाथ दळवी, हेमलता मुनोत व संतोष मिसाळ यांना कळविण्याचे आव्हान शिक्षक परिषदेने केले आहे.

 655 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.