महिला कॉंग्रेसच्या वतीने जीवनदान अभियान

राज्य शासनाने केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आयोजित करण्यात आले शिबिर

कल्याण : सध्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सरकारच्या वतीने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण पश्चिमेतील वाडेघर येथे महिला कॉंग्रेसच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षा कांचन योगेश कुलकर्णी यांच्या वतीने जीवनदान अभियानांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
       गेले कित्येक महिने महाराष्ट्रातील जनता कोरोना सारख्या भयंकर महामारीशी लढा देत आहे. या लढाईत डॉक्टर रुग्णांना वाचविण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अशातच आता महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची हि कमतरता भरून काढण्यासाठी सरकारच्या वतीने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांना रक्तदान करणे सोपे व्हावे यासाठी  अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चारूलता टोकस यांच्या आदेशानुसार, माजी आमदार संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाने आणि जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा कांचन योगेश कुलकर्णी यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
       या शिबिरात संकल्प रक्तपेढीने रक्तसंकलनाचे कार्य केले. आयोजित या रक्तदान शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वाडेघर परिसरातील सुमारे ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सरकारच्या आवहानाला प्रतिसाद दिला. यावेळी आयोजक कांचन कुलकर्णी आणि संकल्प ब्लड बँक कल्याण यांच्या वतीने रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देऊन गौरविण्यात आले.
ह्या शिबिराला काँग्रेस नगरसेविका जान्हवी पोटे,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष देसले, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव, सेवादलचे जिल्हाध्यक्ष लालचंद तिवारी, सोशल मीडिया अध्यक्ष मनोज सिंग, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष गीता चौधरी आणि शबाना शेख, निकिता पटेल, पॉली जेकब, वाडेघर गावचे पोलीस पाटील नरेश पाटील, कल्याण मधील मधुमेह तज्ञ डॉ.रमिझ फालके,गफ्फार शेख आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट दिली.

 428 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.