बेस्ट बस व दुचाकीचा अपघात

तरुणीचा दुर्देवी मृत्यू तर तरुण गंभीर

ठाणे : आज संध्याकाळी ४ ते ४.३० च्या दरम्यान तिन हात नाक्यावरून हायवेने मुलुंडच्या दिशेने एमएच – ०४ – एचसी – १३१९ या मोटारसायकल वरून जाणाऱ्या दोन जणांना सी ४२ या बेस्टच्या बस ने उडवले ही मोटारसायकल पुरुष चालवत होता तर पाठीमागे एक तरुणी बसली होती, बसचा धक्का लागताच दोघेही गाडी सह खाली पडले पाठच्या सीटवर बसलेली तरुणी ही खाली पडताच , बसच्या मागचे चाक तिच्या मानेवरून गेल्या मुळे तिचा जागीच मृत्यू झाला, मोटारसायकल चालवणारा बेशुद्ध झाल्या मुळे त्याला एका टेम्पो मध्ये ठेवून हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहे,ह्या दोघांचे नाव आणि पत्ता अजून समजलेला नाही, अपघातातील मोटार सायकल प्रमोद बाळकृष्ण सैम यांच्या नावावर आहे, नौपाडा पोलिसांनी बेस्टची बस व मोटारसायकल दोन्ही ताब्यात घेतली आहे या बाबत अधिक तपास करत आहेत

 446 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.