लॉकडाऊनमुळे नोकरी गेली आणि सुरु झाला पती पत्नीत वाद, आईचा शोध सुरुच
कल्याण : खाडीत पाण्याच्या मधोमध सापडलेल्या दोन चिमुकल्यांच्या वडिल असल्याचा दावा एका व्यक्तीने केल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. मात्र आई अद्याप बेपत्ता आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. आर्थिक तंगीने आमच्यात थोडाफार वाद होत होता ती असे पाऊल उचलेल असे मला वाटले नव्हते अशी कबूली मुलाच्या वडिलाने पोलिसाना दिली आहे.
डोंबिवली खाडी मधोमध एक छोटय़ाशा टापूवर एक सहा महिन्याचा आणि दुसरा दोन वर्षाचे दोन चिमुकले रडत होते. पाणी वाढत होते. काही ग्रामस्थांची नजर या दोन्ही लहान मुलांवर गेली. कचोरे गावातील दोन तरुण गणेश मुकादम, तेजस मुकादम हे दोघे पाण्यात उतरले. दोन चिमुकल्याचे जीव वाचवित विष्णूनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय साबळे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तपास पथके तयार केले. या दोन चिमुकल्यांना सोडून आईने आत्महत्या केली का असा प्रश्न सगळ्य़ांसमोर होता. मात्र महिलेचा मृतदेह किंवा ती सापडत नाही. ती बेपत्ताच आहे. लहान मुलांजवळ तिचा मोबाईल सापडला आहे. अखेर ठाकूर्ली परिसरात राहणारा सुब्रोत साहू हा व्यक्ती पोलिसांसमोर आला आहे. त्याने त्या दोन लहान मुलांचा वडिल असल्याचे सांगितले आहे. विष्णूनगरचे पोलिस अधिकारी विक्रांत सोनावणे यांनी सांगितले की, सुब्रोत साहू हा व्यक्ति त्या दोन चिमुकल्यांचा वडिल असल्याचे सांगितले आहे. मात्र या बाबत चाौकशी सुरु आहे. तोच व्यक्ती मुलांचा वडिल आहे का याची कसून चौकशी केली जात आहे. महिला अद्याप बेपत्ता आहे. मात्र सुब्रोत याचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली. आर्थिक परिस्थिती खालावल्याने पती पत्नीमध्ये वाद व्हायचा. पत्नी प्रिया इतक्या टोकाचे पाऊल उचलेल असे पत्नी सुब्रोतला आजही वाटत नाही. आमच्या पद्धतीने प्रिया साहू हिचा शोध सुरु आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस या प्रकरणावर जास्त बोलायला तयार नाही.
624 total views, 2 views today