बाबूभाई पेट्रोल पंप ते कॅसल मिलपर्यंत असलेला वाहतूक ब्रीज दुतर्फा खुला

आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश

ठाणे : बाबूभाई पेट्रोल पंप ते कॅशल मिल पर्यंत असलेला उड्डाणपूल उशिरा का होईना पण अखेर आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सुरू झाला.
ठाण्यातील या भागातील वाहतूक कोंडी कमी व्हावी या करिता आ. केळकर यांनी तत्कालीन पोलीस अधिकारी पालवे, महापालिका अधिकारी पाफळकर यांच्यासह पुलाची पाहणी करून बाबूभाई पेट्रोल पंप ते मीनाताई ठाकरे चौक पर्यंत असणाऱ्या पुलावर दुतर्फा वाहतुक सुरू करावी अशी सूचना केळकर यांनी त्यावेळी केली होती व या बाबत सतत् पाठपुरावा सुरू ठेवला होता.
या उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू झाल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या दुहेरी वाहतुकीमुळे बाबुभाई पेट्रोल पंप, तसेच मीनाताई ठाकरे चौक (कॅसल मिल) येथे होणारी वाहतूककोंडी टाळता येणार आहे.
या उड्डाणपुलांच्या उभारणीनंतर काही प्रमाणात या रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळण्यास मदत झाली आहे. या उड्डाणपुलामुळे माजीवाडा नाक्यावरून येणाऱ्या वाहनांना थेट जेल तलाव अथवा एलबीएस मार्गावर उतरता येते. पण त्याचवेळी एलबीएस मार्गावरून माजीवडा नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बाबुभाई पेट्रोल पंपासमोरील अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. खोपट येथील एसटी स्टॅंडच्या सिग्नलवरून मोठया प्रमाणात वाहने सुटल्यानंतर त्यांची बाबूभाई पेट्रोलपंपासमोर कोंडी होत होती. पेट्रोलपंपावरील वाहनांची रांग आणि सिग्नलवरून येणाऱ्या वाहनांमुळे ही कोंडी होत होती. या कोंडीतून सुटका होण्यासाठी तसेच या उड्डाणपुलाचा शंभर टक्के वापर होण्यासाठी बाबूभाई पेट्रोल पंपाच्या येथून माजीवडाच्या दिशेने या उडडाणपुलावर दुहेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी  केळकर यांनी केली होती. त्यानुसार या उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या दुहेरी वाहतुकीमुळे माजीवाडा नाक्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करा – आ. केळकर.
महापालिकेचे अधिकारी पाफळकर यांनी केलेल्या अतीव दिरंगाईमुळे च या उड्डाणपूलावर दुतर्फा वाहतूक सुरू होण्यास उशीर झाला. त्यामुळे हजारो वाहनचालकांना हा उड्डाणपूल दु तर्फा सुरू होण्यास वाट पाहावी लागली असे केळकर यांनी सांगून त्यांची व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय या उड्डाणपुलावर वाहतूक नियोजना करिता ट्रॅफिक वार्डन  ठेवावेत, आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक टाकावेत, बॅरेक ठेवावेत अशी मागणीही  केळकर यांनी वाहुतक शाखेकडे केली आहे.

 467 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.