शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात जोरदार निदर्शने


*ट्रॅक्टर,नांगर घेऊन शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभाग*, *कृषि कायद्याची होळी*
ठाणे : केंद्र सरकारने लादलेल्या कृषि कायद्याच्या विरोधात गेले अनेक दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत.  या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या आवाहनाला समर्थन देण्यासाठी *राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण  मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली   राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, प्रदेश चिटणीस ,ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्यासह शेतकरी नांगर आणि ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते.
सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने तीन कृषी कायदे पारित केले आहेत. हे तिन्ही कायदे शेतकऱ्याना मारक असल्याने शेतकर्यांनी मोठे आंदोलन उभारले आहे.  शेतकर्यांच्या या आंदोलनाला देशभर पाठिंबा मिळत असतानाही मोदी सरकारकडून हे कायदे मागे घेतले जात नसल्याने शेतकऱ्यानी बंदचे आवाहन केले होते. या बंदमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. ” किसानो के सम्मान मे, राष्ट्रवादी काँग्रेस मैदान मे; मोदी- शहा मुर्दाबाद, कृषिकायदे रद्द करा” या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कृषि कायद्याच्या प्रतिंची होळीदेखील केली. त्यामुळे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमारे तीनशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे,  या आंदोलनात पंजाब येथील शेतकरी लखबीरसिंह गिल हे “आय एम फार्मर , नाॅट  ए टेररीस्ट” असा फलक घेऊन सहभागी झाले होते. तर एक शेतकरी चक्क नांगर घेऊन आंदोलनात आला होता. 
यावेळी शहराध्यक्ष  आनंद परांजपे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने . मूल्य उत्पादन आणि कृषी सेवा अधिनियम, २०२०, आवश्यक वस्तू (संशोधन) अधिनियम, २०२० आणि  शेतकऱ्यांचं उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) अधिनियम, २०२० हे कायदे संसदेतील पाशवी बहुमताच्या जोरावर  मंजूर केले आहेत. त्याविरोधात अनेक शेतकरी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत आंदोलनाला बसले आहेत.     हे नवीन कायदे लागू झाल्यास कृषी क्षेत्रही भांडवलदारांच्या किंवा कॉर्पोरेट कुटुंबांच्या हातात जाईल. 
शेतकऱ्यांना शेतीमाल कुठेही व कोणालाही विकण्याचे स्वातंत्र्य. विधेयकात स्पष्टपणे खासगी कंपन्यांचा उल्लेख आहे. उद्या या व्यापारात मोठ्या खासगी कंपन्या उतरतील, यात तीळमात्र शंका नाही. त्या आरंभी कदाचित अधिक भाव देतील व शेतकरी त्यांना शेतमाल विकतील. त्यामुळे बाजार समित्या ओस पडतील. त्यानंतर नाईलाज म्हणून मोठ्या कंपन्या देतील त्या भावाने, शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावी लागेल. सरकार हमी भावाने खरेदी करणार नसेल, तर मोठ्या कंपन्या हंगाम सुरू झाल्यानंतर खरेदी न करता भाव पडेपर्यंत थांबतील आणि शेतकर्यांना  देशोधडीला लावतील. त्यामुळे हा कायदा रद्द करून अन्नदात्याला न्याय द्यावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. 
या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस तथा कामगार नेते संजय वढावकर, नितीन पाटील, प्रकाश पाटील, मोहसीन शेख, पल्लवी जगताप, प्रियांका सोनार, कैलास हावळे, रमेश दोडके, सचिन पंधरे, अ‍ॅड. विनोद उतेकर, राजू चापले, दीपक क्षत्रिय, दिलीप नाईक, जतिन कोठारे, विधानसभा अध्यक्ष  विजय भामरे, महेंद्र पवार, विक्रांत घाग, शहर कार्यकारिणी सदस्य प्रभाकर सावंत, सिल्वेस्टर डिसोझा, रविंद्र पालव, प्रविण भानुशाली, शिवा कालुसिंह, संजीव दत्ता, विजय पवार, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रत्नेश दुबे, निलेश कदम, निलेश फडतरे, तुळशीराम म्हात्रे, विशाल खामकर, विलास पाटील, कौस्तुभ धुमाळ, संताजी गोळे, राहुल ठाणेकर, किशोर चव्हाण वॉर्ड अध्यक्ष सुमित गुप्ता, विक्रांत चव्हाण, किशोर राठोड, अनिल वजले, रोहित चापले, जितेंद्र मिश्रा, शिवा यादव, फिरोज पठाण, दिनेश सोनकांबळे, सुभाष चव्हाण, हिरेंद्र पांचाळ, राम धुरीया, युवक पदाधिकारी हैदर शेख, विरेश शेट्टी, अभिषेक पुसाळकर, संकेत नारणे, संदिप येताळ, रोहित भंडारे, राजेश म्हामुणकर, विशाल गायकवाड, मंगेश तांबे, निलेश गायकवाड, श्रावण भोसले, श्रीकांत भोईर, के. पी. आहाद, कौशिक शेख, राजेश कदम, निखील गायकवाड, सुनिल निशाद, योगेश वाघमारे, सिद्दीक शेख, आकाश पगारे, विकी सोनकांबळे, जितेश पाटील, संकेत पाटील, मोहसीन मुल्ला, संदिप पवार, महिला पदाधिकारी ज्योती निंबर्गी, शशीकला पुजारी, फुलबानो पटेल, माधुरी सोनार, कांता गजमल, भानुमती पाटील, नलीनी सोनावणे, अनिता मोटे, राणी देसाई, स्मिता पारकर, माया केसरकर, साबिया मेमन, अपर्णा पाटील, वंदना हुंडारे, शुभांगी कोळपकर, सुरेखा शिंदे, मनिषा भाबड, सुवर्णा खिल्लारे, संगिता चंद्रवंशी, मंजू येरुणकर, विमल लोध, विमल पाटील, सोमा डे, अंजलीकुमार, स्नेहल चव्हाण, ज्योती जाधवर, वर्षा पाठारे, प्रज्ञा जाधव, कल्पना नार्वेकर, गायकवाड ताई, युवती पदाधिकारी पुजा शिंदे, श्रुती पुरकर, पुजा डांबले, श्रद्धा चव्हाण आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 455 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.