शहापुर तालुका एमएमआरडीए मध्ये समाविष्ट करा !

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

शहापूर ( शामकांत पतंगराव ) : ठाणे जिल्ह्यातील। शहापुर तालुक्याचे क्षेत्रफळ भौगोलिक दृष्ट्या मोठे आहे. असे असतानाही  प्रादेशिक योजनेत शहापूर तालुक्याचा समावेश असूनही घोषित योजनेत समावेश नसल्याने विकासाच्या दृष्टीने प्रतीक्षेत असलेल्या शहापुर तालुका एमएमआरडीए मध्ये समाविष्ट करावा अशी मागणी शहपूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी नगरविकासमंत्री  एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
शहापूर हे तालुक्याचे मुख्यालय असून ते मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील महत्वाचे ठिकाण आहे.
भातसा,तानसा व वैतरणा यांसारख्या मोठ्या जलाशयातून मुबंईकरांची तहान भागविणारा व सर्वाधीक पाणी पुरवठा करणारा धरणांचा तालुका आहे. . शहापुर तालुक्यात मध्य रेल्वेची वासींद, आसनगाव, आटगाव, खर्डी, तानशेत,  उंबरमाळी, कसारा अशी सात स्थानके असून  ह्या स्थानकातून दररोज लाखों चाकरमानी व प्रवाशी  प्रवास करीत असतात. 
मुंबई शहराला पाण्याने  समृद्धी करणाऱ्या शहापुर तालुक्याचा विकास, व दळणवळण गतिमान होण्यासाठी  शहापुर तालुका  मुंबई महानगर प्रदेशात समावेश करण्यासाठी शासनाकडे वारंवार  पत्रव्यवहार केला असून २३ ऑगस्ट २०१८ ,रोजी शहापुर तालुक्याचा एमएमआरडीए मध्ये सामाविष्ट करण्याच्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे-रायगड,-पालघर ह्या प्रदेशाची प्रादेशिक योजना शासनाने ६ जानेवारी २०१८ च्या अधिसूचनेनव्ये मंजूर केली होती या योजनेमध्ये शहापुर तालुक्याचा समावेश असल्याचे सांगितले. परंतु घोषीत योजनेत  शहापूर तालुक्याचा समावेश नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश आणि मुंबईला पाणी पुरवठा करणारी गावे तहानलेली राहून मुंबईची तहान भागविणाऱ्या  तालुक्याचा विकास व मुंबई महानगरचे शहापुर तालुक्याबाबतचे कर्तव्य  ही विशेष बाब म्हणून  शहापूर तालुका मुबंई महानगर प्रदेश  विकास प्राधिकरणाच्या  कार्यक्षेत्रात समाविष्ट करून शहपूरचा विकास गतिमान करावा अशा प्रकारची मागणीमाजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

 514 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.