कॉज फाऊंडेशन आणि वामनराव ओक रक्तपेढी तर्फे रक्तदान शिबिर

रक्ताचा तुटवड भरून काढण्यासाठी आयोजित केले होते शिबिर

ठाणे : कॉज फाऊंडेशन आणि वामनराव ओक रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आज ६ डिसेंबर, रोजी, कळवा येथे संपन्न झाले. ह्या रक्तदान शिबिरात २६ रक्तदात्यांनी यशस्वीपणे सहभाग घेतला.
कॉज फाऊंडेशनच्या संस्थापिका कल्पना मोरे, जितेश मोरे, मंदार शेवडे आणि त्यांच्या सहकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच वामनराव ओक रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच प्रकल्प समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध केळकर, कार्यवाह कविता वालावलकर, कोषाध्यक्ष मुकुंद बेलसरे आणि सहकार्यवाह, अजय पाठक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सध्या कोरोना संकटात रक्ताचा जाणविणारा रक्ताचा तुटवडा भरुन काढणे व त्यासाठी ऐक्छिक रक्त्दानासाठी एक नागरिक म्हणून पुढे येणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असे मत वामनराव ओक रक्तपेढीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय महाजन यांनी व्यक्त केले.

 553 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.