सेंट जोसेफ महाविद्यालयात ऑनलाईन फेसबुक लाईव्ह वेबिनार संपन्न

जागतिक एड्स दिवसानिमित्त आयोजीत करण्यात आला होता उपक्रम

कल्याण : ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ महाविद्यालय विरार जिल्हा पालघर.,  एन. एस. एस. विभाग आणि विश्र्वभान प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक एड्स जागृती दिवस महाविद्यालयात ऑनलाईन फेसबुक लाईव्ह घेण्यात आले. यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक व तंबाखू मुक्त शाळा पालघर जिल्हा सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी मिलिंद पाटील व जिल्हा एड्स नियंत्रण संस्था पालघर अतिरिक्त जिल्हा पर्यवेक्षक प्रफुल्लता  पाटील, सेंट जोसेफ महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. सुभाष डिसोझा  उपस्थित होते.
 यावेळी मिलिंद पाटील यांनी व्यसनाधीनता आणि एड्स विषयी माहिती दिली. तर प्रफुल्लता पाटील यांनी एड्स विषयी माहिती दिली. कॉलेज चे प्राचार्य डॉ. सुभाष डिसोझा यांनी मार्गदर्शन केले. तर विश्र्वभान प्रतिष्ठान चे अध्यक्ष जगदीश संसारे यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय दिला. एड्स रोगाची जागृती व्हावी असा हेतू होता आणि तो सफल झाला या वेळी कविता, चारोळी, घोषवाक्य लिखित आणि व्हिडिओ व्दारा सादर करून जागृती केली व पाहुण्यांचे आभार विश्र्वभान प्रतिष्ठानचे सचिव अश्र्विनी टिळक यांनी केले.

 437 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.