पाणी मागाण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेवर सामुहिक लैंगिक अत्याचार

कल्याण तालुक्यातील कांबा येथील घटना

कल्याण : पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून एकट्या असलेल्या महिलेवर दोन इसमांनी पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कांबा परिसरात घडली आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बुधवारी रात्रीच्या सुमारास पिडीत महिला ही घरी एकटी असल्याचा फायदा घेऊन कांबा परिसरात राहणाऱ्या दोन इसमांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने पिडीत महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून दारुच्या नशेत तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पिडीत महिलेने केली आहे. सदर महिलेच्या तक्रारीनुसार कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन (टिटवाळा ) यांनी कसोशीने शोध घेऊन या घटनेतील दोघा नराधमांना  अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
 त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ डिसेंबर पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेबाबत अधिक तपास मुरबाड उपविभागीय अधिकारी डॉ.बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू वंजारी हे करत आहेत.

 1,110 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.