विकासकामांची नियोजनबद्ध भौतीक व आर्थिक उद्दिष्टपूर्ती शंभर टक्के करा

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना,सर्व विभागांचा घेतला सखोल आढावा

ठाणे : कोरोनाचा मुकाबला करत असताना आर्थिक वर्ष संपण्यास केवळ ४ महिने बाकी असून विकासकामांची नियोजनबद्ध भौतीक व आर्थिक उद्दिष्टपूर्ती शंभर टक्के करा. अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी सर्व विभाग प्रमुख यांना दिल्या. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवार आणि शुक्रवारी त्यांनी प्रत्येक विभागाचा सखोल आढावा घेतला.
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जिल्हा परिषद काम करते. या संस्थेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी काम करतात. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतेच डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी सामान्य प्रशासन विभाग , ग्रामीण पाणी पुरवठा, लघुपाटबंधारे विभाग, महिला व बाल विकास विभाग, आरोग्य विभाग , तसेच आरोग्य विभागा अंतर्गत येणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान, समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग प्राथमिक, समग्र शिक्षा अभियान, ग्रामीण विकास यंत्रणा, स्वच्छता व पाणी , शिक्षण (माध्यमिक) कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग ,वित्त विभाग,बांधकाम विभाग, ग्रामपंचायत विभाग, नरेगा आदी विभागांचा आढावा घेतला. यावेळी प्रत्येक विभागाच्या विभाग प्रमुख यांनी सादरीकरण करून विभागाची माहिती दिली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता) छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन विभाग) अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुभाष भोर, कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा व लघुपाटबंधारे ) एच. एल. भस्मे, कार्यकारी अभियंता ( बांधकाम) नितीन पालवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास) संतोष भोसले, समाज कल्याण अधिकारी डॉ.रमेश अवचार, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) शेषराव बडे, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) ललिता दहितुले, उपस्थित होते.

 377 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.