अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते कुणाल मनोज चव्हाण आणि रुग्वेद मोहन वाघमारेच्या पालकांकडे  धनादेश सुपूर्त

ठाणे : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ ठाणे जिल्हयातील कुणाल मनोज चव्हाण आणि रुग्वेद मोहन वाघमारे या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सदर प्रस्ताव मंजूर केले होते. आज ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चव्हाण दाम्पत्यांना ७५ हजाराचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) ललिता दहितुले उपस्थित होत्या.
कुणाल चव्हाण हा ज्ञानपीठ विद्यामंदिर डोंबिवली शाळेतील विद्यार्थी होता. तर  रुग्वेद वाघमारे हा गावदेवी विद्यामंदिर , डोंबिवली या शाळेचा विद्यार्थी होता. काही महिन्यापूर्वी या दोघांचे अपघाती निधन झाले होते.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना शालेय विद्यार्थ्यांसाठी लागू असून शाळेतील विद्यार्थ्यांना अपघात विमा सरंक्षण देण्यासाठी ही योजना सुरू आहे. जिल्हा स्तरावर शिक्षण विभागाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाते.

 279 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.