ठाणे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ कार्यकारिणी जाहिर

राहुल अकुल अध्यक्ष आणि सुनील पवार महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ३५ युवा शिक्षकांची नेमणुक करण्यात आली.

कल्याण : महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ प्रमुख तय्यप्पा शेंडगे आणि संदीप मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ कार्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली.
शारिरिक शिक्षण शिक्षकांनादेखील इतर विषय शिक्षकाप्रमाणे मान सन्मान देण्यात यावा. वीनाअनुदानित आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळावर प्रशिक्षित शारिरिक शिक्षण शिक्षकांची भरती करण्यात यावी. तसेच ओलिंपिक मध्ये मेडल मिळवण्यासाठी खेळाडूंचा पाया मजबूत करण्यासाठी संच मान्यतेनुसार शाळेत रिक्त पदे भरण्यात यावी. मुंबई विद्यापीठात क्रीड़ा संचालक यांची नेमणुक करण्यात यावी अश्या अनेक मागण्या पुर्णत्वास नेण्यासाठी जिल्हा महासंघाची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात राहुल अकुल अध्यक्ष आणि सुनील पवार महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ३५ युवा शिक्षकांची नेमणुक करण्यात आली.
यामध्ये अमोलकुमार वाघमारे -कार्याध्यक्ष, जितेंद्र म्हात्रे, कांचन चिकने, प्रशांत देशमुख- उपाध्यक्ष, प्रसाद यादव, प्रदीप मसूद, रूपेश माड़वी- सहसचिव, निलेश चतुर- खजिनदार, रविन्द्र देसाई, संजय माने, हितेश मालांडकर, राजकुमार कोंडे, उदयवीर टोपो, सतिश रक्ते, जयवंत दिनकर, बाबूराव कोरवी, चेतना गावंड- संघटक, मितेश जैन- प्रसिद्धि प्रमुख, मोनाली जाधव- प्रसिद्धि सचिव, योगेश वायल, मोरेश्वर सुतार, सुभाष गायकवाड़, अतुल शिंदे, शरद मगर, मनोज ठाणगे, योगेश शिंदे, दिपक खरात, विठ्ठल शिंदे, पुष्कर पवार, दक्षता पवार – सदस्य या प्रमाणे नेमणुक करण्यात आली.

 343 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.