सोशल डिस्टनसिंगचे पालन करत गुरू नानक जयंती साजरी

दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून सर्वाना वेळ ठरवून देण्यात आली होती.

कल्याण : कल्याणच्या गुरुद्वारामध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन करत गुरू नानक यांची जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने साधेपणाने जयंती साजरी केली. तसेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची असलेली गर्दी यावेळी तुरळक होती. दरवर्षी गुरुद्वारचया परिसरात मोठ्या प्रमाणात लंगर लागत असायचा यावेळी तो रद्द करून जेवणाचे पॅकेट देण्यात आले आहे. त्याचबरोबर दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून सर्वाना वेळ ठरवून देण्यात आली असल्याची माहिती गुरुसिंग सभाचे अध्यक्ष हरबीर सिंग हेर यांनी दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १०  टक्केच भाविकांनी हजेरी लावली असल्याचे ते म्हणत होते.

 269 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.