वृत्तपत्र विक्रेत्यांच्या असंघठीत कामगार नोंदणीसह कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा करणार

  

आमदार संजय केळकर यांनी साधला सांगलीतील वृत्तपत्र विक्रेत्यांशी संवाद
सांगली : वृत्तपत्र विकण्यासाठी कल्याणकारी मंडळाच्या योजना तात्काळ राबवणे व वृत्तपत्र विक्रेत्यांची असंघटित कामगार म्हणून नोंदणी करणे यासाठी पाठपुरावा करणार असून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रगतीसाठी कायम साथ देईन असे आश्वासन अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार व ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी दिले. केळकर यांनी सांगली येथे वृत्तपत्र विक्रेता भवनला भेट देऊन वृत्तपत्र विक्रेता संघटना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
  आमदार केळकर यांनी यावेळी वृत्तपत्र विक्रेता भवन बद्दल सांगली संघटनेचे अभिनंदन केले असे विक्रेता भवन महाराष्ट्रात कुठे पाहायला मिळत नाही असे गौरवोद्गार काढले लवकरच ठाण्यात आपल्या मतदारसंघात सुद्धा असे भवन उभा करून असे त्यांनी जाहीर केले.
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी यापुढेही पाठपुरावा करत राहणार आहे. त्याचबरोबर इतरही प्रत्येक प्रश्नाच्या वेळी मी तुमच्यासोबत असेल असे आश्वासन केळकर यांनी दिले. वृत्तपत्र विक्री करिता बँकांमार्फत तातडीच्या कर्जाची सोय आम्ही ठाण्यामध्ये केली आहे अशा प्रकारची व्यवस्था सांगली मध्ये करता येईल गरज पडेल तेथे मी मदत करेन असे सांगितले. सांगलीमध्ये २६ व २७ जानेवारी २०२० ला झालेल्या राज्य अधिवेशनाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल व हे अधिवेशन अस्मरणीय केल्याबद्दल सांगलीतील वृत्तपत्र विक्रेता एजंटांचे केळकर यांनी अभिनंदन केले. अधिवेशनाच्या नियोजनात सांगलीकरांनी चांगला आदर्श उभा केला असे मतही व्यक्त केले.यावेळी नगरसेवक संजय कुलकर्णी उपस्थित होते.
       महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी  प्रास्ताविक केले.सांगलीची वृत्तपत्र विक्रेता संघटना व इतर कामाबाबत तसेच विक्रेता भवनबाबत माहीती दिली. वृत्तपत्र विक्रेत्यांना ताकद देणारेंच्या पाठीशी आम्ही नक्की राहू असे स्पष्ट केले.जिल्हा संघटक सचिन चोपडे यांनी स्वागत केले. केळकर यांचा सत्कार दत्तात्रय सरगर, विशाल रासनकर, अमोल साबळे आदींनी केला.आभार सचिन माळी यांनी मानले. यावेळी सागर घोरपडे, कृष्णा जामदार, नागेश कोरे,  गणेश कटगी, नारायण माळी, भालचंद्र लिमये,  सुनिल कट्याप्पा, बंदेनवाज मुल्ला, बाळासाहेब पोरे, प्रशांत साळुंखे, बाळासाहेब पाटिल, देवानंद वसगडे, बसाप्पा पट्टणशेट्टी, निलेश कोष्टी, दिपक वाघमारे, अक्षय जाधव, संदिप गवळी, विनोद पाटिल आदी वृत्तपत्र विक्रेते व पदाधिकारी उपस्थित होते.
  वृत्तपत्र विक्रेत्यांनी संग्राम देशमुखांना साथ द्यावी
   भाजपच्या सत्ता काळात वृत्तपत्र विक्रेत्यांसह असंगठीत कामगारांसाठी सुरक्षा मंडळ स्थापन केले. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या योजना राबवण्यासाठी अभ्यास समिती नेमली.अभ्यास समितीने सविस्तर अहवालही दिला आहे.हा अहवाल स्विकारून कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मी प्रयत्न करीत आहेच, पण अधिक ताकदीने लावण्यासाठी पदवीधर निवडणूकीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना साथ द्या, पदवीधर मतदार वाचकांना देशमुख यांना मतदान करण्याचे आवाहन  करा  अशी विनंती केळकर यांनी यावेळी केली. 

 268 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.