स्पर्धेत १००हुन अधिक किल्ल्यांची केली होती मांडणी
शहापूर : शहापूर तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या शिवसह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने अल्याणी,गेगांंव नांदवळ येथे बालगोपाळांसाठी घेण्यात आलेल्या किल्ले सजावट व प्रदर्शन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यात शंभर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
संस्थेमार्फत अल्याणी,विठ्ठलगांव,गेगांव व नांदवळ या गावात स्वतंञ स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठीसंस्थेचे अध्यक्ष सतीश सापळे, रिकी खाडे,दिलीप मोरे,भगवान निमसे,राजेश खारीक,मोहन सासे,बाळकृष्ण सासे,विठठल डोंगरे,विलास डोंगरे,दिंगबर डोंगरे,गणेश वाळींबे यांनी मेहनत घेतली.किल्ले सजावट स्पर्धेसाठी शिवव्याख्याते भगवान विशे हे परीक्षक होते.
प्रथम पारीतोषिक १००० रुपये व द्वितीय पारितोषिक ५००रुपये. व प्रत्येक स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक विठठल डोंगरे,भगवान निमसे,किसन घोडवींदे,श्रीकांत सासे,मोहन सासे,राजेश खारीक यांच्या मार्फत मिळाले तर संस्थेकडुन प्रशस्तिपञक देवुन स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.
426 total views, 1 views today