ठुणे ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन

उपसरपंच दिनेश वेखंडे यांच्या संकल्पनेतून साकारले अँड्रॉइड ऍप

शहापुर : शहापुर तालुक्यातील ठुणे येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले,तसेच विविध विकास कामाचे भूमिपूजन व उपसरपंच दिनेश वेखंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अँड्रॉइड ऍपचेही उदघाटन करण्यात आले.
पुत्रदा एकादशी निमित्त भरत असलेल्या यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या ठुणे ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे उद्घाटन शहापूरचे आमदार दौलत दरोडा,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उपसरपंच दिनेश वेखंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री विठ्ठलाचे ठुणे या अँड्रॉइड ऍपचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
ठुणे ग्रामपंचायत मध्ये सन १९६२ ते २०१६ काळात ज्या सरपंच व उपसरपंच यांनी कामकाज बघितले होते त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या वेळी मनसेचे लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी,जिल्हा सचिव राकेश वारघडे ,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोपतराव,तालुका अध्यक्ष जयवंत मांजे ,मनविसे तालुका अध्यक्ष विजय भेरे,तालुका सचिव जयवंत भोईर ,मनविसे ग्रा.जिल्हा उपअध्यक्ष देवेंद्र निचिते ,तालुका उपाध्यक्ष मदन धानके अमोल बोराडे,आसनगाव शहर अध्यक्ष अविनाश चंदे,विभाग अध्यक्ष बाळू भेरे,हरेश विशे ,ग्रामपंचायत सदस्य विकी मांजे,मनविसे शहापूर शहर अध्यक्ष सिद्धार्थ शिंदे,रविकांत बोंब,गणेश मुंडले,प्रमोद डोहले,प्रवीण करण ,हिराजी करण ,सुरज सोमवंशी,विक्रम शिरस्कार,इ मनसे पदाधिकारी, तसेच ठुणे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते

 596 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.