गांव तिथे ओबीसी मोर्चा शाखा स्थापन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदेच्या सर्वतोपरी पाठिशी राहणार- खासदार कपिल पाटील
शहापूर (शामकांत पतंगराव) : भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्हा ओबीसी मोर्चाच्या वतीने जिल्हा कार्यकारिणी पदनियुक्ती सोहळा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदे यांच्या वतीने भिवंडी बायपास येथील वाटिका हॉटेल या ठिकाणी आयोजीत करण्यात आला होता.यावेळी ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन पदनियुक्त करण्यात आले.
 गेल्या काही दिवसांपुर्वी ओबीसी मोर्चाची ठाणे ग्रामिण जिल्ह्याची जबाबदारी भाजपचे रविंद्र चंदे याच्याकडे सोपवण्यात आली असुन चंदे यांनी खासदार कपिल पाटील,प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर तसेच आमदार तथा जिल्हाध्यक्ष किसन कथोरे याच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केली असुन गाव तिथे ओबीसी शाखा स्थापन करु असे आश्वासन  कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदे यांनी दिले.
 या नियुक्ती सोहळ्यास प्रदेश महिला मोर्चाच्या वनिता लोंढे,हरीचंद्र भोईर, अनिलजी पंडित तसेच प्रदेश आणि जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. येणाऱ्या काळ हा निवडणुकीचा असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला लागण्याची गरज आहे. ओबीसी मोर्चा यांची महाराष्ट्रभर कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असुन  १ बूथ १० ओबीसी हा कार्यक्रम समोर ठेवून ओबीसी मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर काम करणार असल्याचे योगेश टिळेकर यांनी यावेळी सांगितले.
  गांव तिथे ओबीसी शाखा जिल्हाध्यक्ष रविद्र चंदे यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत पक्षाच्या संघटना वाढीस सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर राहण्याचे आश्वासन खासदार कपिल पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना दिले.
477 total views, 1 views today