“आमची अस्नोली “पुस्तकाचे प्रकाशन

पुस्तकात संपुर्ण अस्नोली विषयी माहिती असून गावाची वंशावळ आहे.यातील विशेष बाब म्हणजे दिनकर घराण्याची वंशावळ जवळपास चारशे वर्षापासुनची आहे.

शहापूर : अस्नोली विकास प्रतिष्ठानने प्रस्तुत केलेल्या “आमची अस्नोली ” या पुस्तकाचे प्रकाशन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
येथील अस्नोली विकास प्रतिष्ठानने माझी अस्नोली हे पुस्तक काढले असून या गावचे इनामदार विवेक परचुरे व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी उपाध्यक्षा सुनिता दिनकर यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिरच्या सभागृहात करण्यात आले.
या पुस्तकात संपुर्ण अस्नोली विषयी माहिती असून गावाची वंशावळ आहे.यातील विशेष बाब म्हणजे दिनकर घराण्याची वंशावळ जवळपास चारशे वर्षापासुनची आहे.या पुस्तकाला सहकार्य करणाऱ्या मदतगार हातांना मंडळाच्या सदस्यांनी पुस्तक,स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मानित केले.
अस्नोलीतील शिष्यवृत्तीधारक तेरा विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य बक्षिसरुपी देऊन गौरवण्यात आले. गावातील चार विद्यार्थ्यांना तीन वर्षासाठी दत्तक घेण्यात आले.
विकास प्रतिष्ठानचे हे कार्य म्हणजे एक नविन पिढीला आदर्श असल्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनिता दिनकर यांनी म्हटले.
कार्यक्रमासाठी पंचायत समिती माजी सदस्य दत्तात्रय मंगळ दिनकर हे ही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी काळुराम दिनकर यांनी तर सुत्रसंचालन कैलास दिनकर, नरेश सातपुते यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप प्रविण सातपुते यांनी आभार मानून केला.

 861 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.