भिवंडी रोड स्टेशन गुड्सशेड – उत्पादक आणि लॉजिस्टिक कंपन्यांसाठी ठरतेय लोडिंग हब

भिवंडी रोड गुड्स शेडमध्ये एकाच दिवशी सर्वाधिक ४५७ टन पार्सलची नोंद झाली आहे

मुंबई : मध्य रेल्वेचे भिवंडी रोड स्टेशन या सणाच्या हंगामात उत्पादक, व्यापारी आणि ग्राहकांना एक अनोखी भेट ठरली.  वस्तू आणि पार्सल बुकिंग साठी सुरू झाल्यापासून २ महिन्यांच्या कालावधीत भिवंडी रोड स्टेशनने   २,५५,८९२ पॅकेजेस द्वारा ४,१७५ टन पार्सल पाठविले आहे.  या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
पहिल्या फेरीत ३,८७६ पॅकेजेस द्वारा ८६.८५  टन पार्सल लोड करून  पाठवण्यात आले .  १०.९.२०२० पासून १५.११.२०२० पर्यंत भिवंडी रोड स्टेशनवरून शालिमार, आजारा, दानापूर आणि पाटणा येथे २१ पार्सल गाड्या पाठविण्यात आल्या असून त्याद्वारे  २,५५,८९२ पॅकेजेसमध्ये ४,१७५ टन पार्सलची वाहतूक करण्यात आली.  या काळात सर्वाधिक लोडिंग ३०.१०.२०२० रोजी आझरा, गुवाहाटी येथे २५,७४९ पॅकेजेसमधून ४५७ टन पार्सल आणि २५.१०.२०२० रोजी २५,३४४ पॅकेजेसमधून ४३५ टन पार्सल वाहतुकीची नोंद करण्यात आली.
भिवंडी रोड स्टेशनवरील लोडिंगने प्रत्येक सेवेसह स्थिर वाढ दर्शविली आहे.  सप्टेंबर -२०२० महिन्यात ९०,८०५ पॅकेजमध्ये १,४६५ टन पार्सल लोडींग  झाले आहे;  ऑक्टोबर -२०२० महिन्यात १,३३,९८० पॅकेजेसमध्ये २,१०२ टन पार्सल आणि नोव्हेंबर -२०२० या महिन्यात आजपर्यंत  ३१,१०७ पॅकेजेसमधून ६०७ टन पार्सल लोडींग  झाले आहे.
भिवंडी रोड स्टेशनवरून  गोदरेज, ओनिडा, एलजी, बजाज, पार्ले-जी, हिंदुस्तान लीव्हर, डेल-मोंटे इत्यादी लोकप्रिय ब्रँडची सौंदर्यप्रसाधने आणि  फर्निचर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे या वस्तू आजपर्यंत पाठविण्यात आल्या आहेत.
मुंबई विभागातील भिवंडी रोड रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेच्या वसई-दिवा-पनवेल मार्गावर आहे.  हा उत्तर-दक्षिण रेल्वे वाहतुकीचा जोडणारा बिंदू आहे शिवाय जेएनपीटी बंदराला रेल्वेबरोबर जोडतो.  भिवंडी हे औद्योगिक शहर आणि वस्त्रोद्योग व वखार केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.  अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, रिलायन्स, स्नॅपडील आणि फेडएक्स सारख्या बर्‍याच ई-कॉमर्स कंपन्यांच्या शहरात शाखा आहेत.
भिवंडी रोड स्टेशनचे अनेक फायदे आहेत जसे की मुंबई आणि ठाणे शहराच्या जवळपास,  ट्रक आणि टेम्पोसाठी पुरेशी पार्किंगची जागा इत्यादी. या प्रोत्साहनात्मक प्रतिसादामुळे केवळ रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली नाही तर स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासही मदत झाली आहे.  निश्चितच  हे रेल्वेकडून उत्पादक, व्यापारी, ग्राहक आणि इतरांना दिलेल्या सणासुदीच्या भेटींपेक्षा कमी नाही.

 298 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.