राष्ट्रवादी युवती काँग्रेसने पोलिसांसोबत साजरी केली भाऊबीज

पोलिसांच्या कर्तव्याची जाण ठेवत त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आयोजित केला कार्यक्रम

ठाणे : भाऊबीज असो, वा अन्य कोणताही सण, पोलिसांना शहरातील शांतता, कायदा सुव्यस्था सांभाळण्यासाठी कामावर हजर राहावे लागते. त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत भाऊबीज सण साजरा करता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने यंदाची भाऊबीज पोलिसांसोबत साजरे करण्याचे ठरवले.त्यानुसार कळवा पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेस ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने भाऊबीज सण साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या काळात पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरवून कोणी काम केले असेल तर ते पोलीस,कोरोनाकाळात कर्तव्य बजावताना अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली,यामध्ये काही पोलिसांना आपले प्राण देखील गमवावे लागले पोलिसांच्या कर्तव्याची जाण ठेवत त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षा पल्लवी जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेसने कळवा पोलीस स्टेशन मधील पोलिसांसोबत भाऊबीज साजरी केली.पोलिसांचे औक्षण करून त्यांना मिठाईचे बॉक्स देऊन त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्षा पल्लवी जगताप,कळवा ब्लॉक अध्यक्षा साबिया मेनन,कळवा-मुंब्रा विधानसभा युवती अध्यक्षा पुजा शिंदे,कळवा ब्लॉक युवती अध्यक्षा तेजश्री गोसावी,मुंब्रा ब्लॅाक युवती अध्यक्षा पुजा दामले,राष्ट्रवादी काँग्रेस कळवा वार्ड अध्यक्षा जिता घुळेकर,रा. कॅां. कळवा वॅार्ड उपाध्यक्षानिलम गायकवाड, रा.कॅां. विद्यार्थी सेल कळवा विभाग अध्यक्ष आकाश पाटिल तसेच रा.युवती कॅां. श्रद्धा चव्हाण, पुजा सिंग, स्नेहांकिता चव्हाण, अर्चना वाघ, तमन्ना टिचर आदी यावेळी उपस्थित होते

 338 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.