एमपीएल स्पोर्ट्स टीम इंडियाचे अधिकृत किट स्पॉन्सर

बीसीसीआयने केली नेमणूक, हा करार तीन वर्षांचा असून एमपीएल स्पोर्ट्सने डिझाईन आणि तयार केलेल्या जर्सीज् भारताचे पुरुष, महिला आणि १९ वर्षांखालील क्रिकेट संघ वापरतील
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एमपीएल स्पोर्ट्ससोबत आपल्या भागीदारीची घोषणा केली. भारतातील सर्वात मोठा ईस्पोर्ट्स प्लॅटफॉर्म मोबाईल प्रीमियर लीगचा एथलेजर वेअर आणि स्पोर्ट्स मर्चन्डाईझ ब्रँड एमपीएल स्पोर्ट्स हा भारतीय क्रिकेट टीमचा नवीन किट स्पॉन्सर आणि अधिकृत मर्चन्डाईझ पार्टनर म्हणून नियुक्त करण्यात आला आहे.
या नवीन धोरणात्मक भागीदारीनुसार एमपीएल स्पोर्ट्सने नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ या तीन वर्षांसाठी करार केला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया २०२०-२१ दौऱ्यामध्ये एमपीएल स्पोर्ट्सच्या बीसीसीआयसोबतच्या भागीदारीचा शुभारंभ होणार असून या दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघ नव्या जर्सीमध्ये पाहायला मिळेल.
वरिष्ठ पुरुष, महिला आणि १९ वर्षांखालील संघ देखील या नवीन किट्ससाठीच्या भागीदारीचा भाग असतील.
भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीबरोबरीनेच एमपीएल स्पोर्ट्स अधिकृत टीम इंडिया मर्चंडायझेसची देखील विक्री करेल. एमपीएल स्पोर्ट्स या जर्सीज् व टीम इंडिया मर्चंडायझेस विशाल श्रेणी परवडण्याजोग्या किमतींना उपलब्ध करवून देईल.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले, “या भागीदारीमुळे भारतीय संघासाठी आणि देशात स्पोर्ट्स मर्चन्डाइझसाठी नवी क्षितिजे खुली झाली आहेत. या क्षेत्राच्या क्षमतांचा लाभ घेण्यासाठी एमपीएल स्पोर्ट्ससारख्या युवा भारतीय ब्रँडसोबत आम्हाला खूप चांगले काम करता येईल अशी आशा आहे. देशातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना प्रतिष्ठित भारतीय क्रिकेट टीम जर्सीसह उच्च दर्जाच्या भारतीय क्रिकेट फॅन मर्चन्डाईझची उपलब्धता वाढावी हा या भागीदारीचा उद्देश आहे.”
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले, “२०२३ पर्यंत भारतीय पुरुष व महिलांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांचे किट स्पॉन्सर म्हणून एमपीएल स्पोर्ट्सची नेमणूक केल्यापासून भारतीय क्रिकेटच्या कारकिर्दीत एका नव्या युगाची पहाट होत असल्याची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की, एमपीएल स्पोर्ट्स टीमच्या किटसाठी नवा अध्याय सुरु करेल आणि भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कोट्यवधी फॅन्सना बीसीसीआयने अधिकृत केलेले मर्चन्डाईझ सहजपणे उपलब्ध होतील.”

 405 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.