एक फराळ सफाई कामगारांसह…

संजय फाउंडेशनने आयोजित केला होता कार्यक्रम

ठाणे : आमदार संजय केळकर यांच्या “संजय फाउंडेशन” मार्फत सफाई कामगारांसह फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील हजेरी पेटी क्र. १ व २ या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार संजय केळकर यांनी सफाई कामगारांसह औपचारिक गप्पा गोष्टी करुन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच सफाई कामगारांना संजय फाउंडेशन तर्फे केळकर यांनी फराळ देऊन मास्क चे वाटप केले.
यावेळी येथील परिसरातील डॉ. अदिती कदम यांचा फाउंडेशनतर्फे केळकर यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला सफाई पेटी चे प्रमुख पाटकर, संजय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश विनेरकर, संतोष साळुंखे, निलेश कोळी, गीतेश माने, विशाल वाघ, नीतीन आंबेकर, प्रतीक सोळंकी, संजय जाधव आदी फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते तर सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 534 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.