२६नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या औद्योगिक बंदला ठाणे जिल्ह्यातून वाढता पाठींबा 

  

महाराष्ट्र राज्य  संयुक्त कृती समितीच्या वतीने दिलेल्या सूचनेनुसार ठाणे जिल्ह्यात संपूर्ण कामकाज ठप्प होईल अशी तयारी करण्याचा झाला निर्णय

ठाणे : भारतातील विविध केंद्रीय कामगार संघटना आणि श्रमिक महासंघांनी केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी धोरणांच्या विरोधात पुकारलेल्या २६ नोव्हेंबर रोजी औद्योगिक भारत बंदला ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कामगार व श्रमिकाकडून मोठा प्रतिसाद मिळत असून हा बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध कामगार संघटनाच्या प्रमुखांची बैठक नुकतीच जेष्ठ कामगार नेते काॅ.एम.ए.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात घेण्यात आली होती.
  या बैठकीत प्रामुख्याने ठाणे जिल्हा इंटक अध्यक्ष सचिन शिंदे,आयटक चे उदय चौधरी,टी.डी.एफ चे चंद्रकात गायकर,श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालीया,हिन्द मजदूर संघाचे जगदीश उपाध्याय,जनरल कामगार युनियनचे धोंडीबा खराटे व मधूसूदन म्हात्रे,सर्व श्रमिक संघाचे कृष्णा नायर,टी.यू.सी.टी.चे रामकरण यादव, आयटकचे ठाणे कार्याध्यक्ष लिलेश्वर बनसोड,निर्मल चव्हाण,इंटक चे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.संदिप वंजारी,ए.आय्.आर.एस्.ओ.चे निलेश यादव,एस्.टी.इंटकचे मनैश सोनकांबळे,कामगार एकता चळवळीचे सूर्यकांत शिंगे, टी.डी.एफ.चे चेतन महाजन,टि.यू.सी.आय्.चे रविंद्र जोशी,काॅ.सुनिल चव्हाण,काॅ.बाबुराव करि,प्रभाकर शेडगे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत महाराष्ट्र राज्य  संयुक्त कृती समितीच्या वतीने दिलेल्या सूचनेनुसार ठाणे जिल्ह्यात संपूर्ण कामकाज ठप्प होईल अशी तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला २६ नोव्हेंबर रोजी कामगारांच्या मागण्यांसाठी बंद आंदोलन यशस्वी करण्याबाबत विविध कार्यक्रम ठरविण्यात आले असून ठिकठिकाणी चौकसभा,प्रवेशद्वार निदर्शने ठरविण्यात आलेली आहे कामगारांमध्ये जाउन जनजागृती  करण्यात येणार आहेत याकरिता ठाणे जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना,सामाजिक संस्था यांना संपर्क करण्याचा प्रयत्न चालू आहे.कामगार संघटना व कामगारांनी एकजुटीने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी सचिन शिंदे,ठाणे इंटक- ८०९७२२३९३९  व उदय चौधरी-आयटक- ९९६९५००३६१9 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 587 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.