टाटा आमंत्रा कोविड सेंटरमध्ये आयुक्तांनी साजरी केली दिवाळी
कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे १ एप्रिल पासून सुरू असलेल्या टाटा आमंत्रा कोवीड सेन्टर मध्ये दिवाळी धनत्रयोदशी निमित्ताने २५ हजार कोरोना रुग्णांना बरे करणाऱ्या कोवीड फायटर योध्दांचा मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केडीएमसीने कोरोना पार्श्वभूमीवर सुरुवाती पासुन लक्ष देत प्रभावीपणे उपाययोजना अमंलबाजवणी धोरण ठेवून कोरोना लढाई लढत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मार्च अखेरपासून उपाययोजना सुरु केल्या. १ एप्रिल पासून टाटा आमंत्रा येथे सुमारे २,४३८ रुग्णांची सोय एकाच वेळेस विलगीकरण करून भव्य इमारतीत ग्रीन झोन, रेड झोन इगतवारी करून औषधे, नाश्ता, जेवण, मिनरल वॉटर आदी सुविधा रुग्णांना देऊन कोरोनामुक्त करण्यात येत आहेत. आतापर्यंत २५ हजारहुन अधिक कोरोना रूग्णावर उपचार करून कोरोना मुक्त झाले आहेत.
मनपा प्रशासनाने कंत्राटी पध्दतीने डॉक्टर, वार्डबाय्,नर्स, यांंची भरती करून कोरोना काळ सुरू झाल्यापासून रूग्ण सेवा करीत आहे. आशा कोवीड फ्रन्ट फायटर यांनी केलेल्या रूग्णसेवा कामामुळे त्यांच्या पाठीवर कैतुकांची थाप देत शुक्रवारी आयुक्त च्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धनत्रयोदशी निमित्ताने आयोजित या क्रार्यक्रमाच्या प्रसंगी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ,मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग आधिकारी डॉ. सरवणकर, कार्यकारी अभियंता घनश्याम नंवागुळ , उप अभियंता प्रमोद मोरे, अभियंता, दिलीप ठाणेकर, टाटा आमंत्रा कोवीड सेन्टर इनचार्ज डॉ. दिपाली साबळे मोरे, उपस्थित होते.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याप्रसंगी कोरोना पीक काळात डॉक्टर, वार्डबाय्, नर्स, हाऊसकिपिंग कर्मचारी, सुरक्षारक्षक मनपा कर्मचारी, आधिकारी या फ्रन्ट फायटर यांनी रात्रदिवस केलेल्या कामाचे कैतुक करीत पत्रकारांनी देखील टाटा आमंत्रा येथील कोवीड सेन्टर येथील कामाबाबत पाहणी करून दिलासादायक बातम्या केल्या. आज मितिला कोरोना पीक अवर कमी झाले असले तरी मनपा क्षेत्रात कोरोना रूग्णांनाच्या उपचारासाठी सुमारे ५ हजार बेड सुविधा उपलब्ध करीत सज्ज असल्याचे सांगितले.
तर नागरिकांनी दिवाळी सण साजारा करीत असताना सोशल डिस्टन नियमांचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करीत योग्य ती खबरदारी घ्यावी. कल्याण स्टेशन येथे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची अँन्टीजेन चाचणी सुरू केली असल्याचे देखील आयुक्तांनी सांगितले.
518 total views, 2 views today