वनविभाग व वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या वतीने पक्षी सप्ताहानिमित्त जनजागृती

कल्याण वनपरिक्षेत्रात जप्त केलेले ६ पोपट, १ ठिपकेवाला घोला तसेच वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी रेस्क्यू केलेले १ पानकावळा, २ घुबड, २ घार, एकुण १२ पक्षी निसर्गमुक्त केले. त्याच बरोबर १ भारतीय अजगर, १ मांडूळ, ३ घोणस, ४ नाग, ५ धामण,  १ घोरपड, १ भारतीय कासव (Flap shell Turtule) इतर वन्यजीव यावेळी निर्सगमुक्त करण्यात आले.

कल्याण : ज्येष्ठ वन अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचा ५ नोव्हेंबर या जन्मदिनापासून ते पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या १२ नोव्हेंबर या जयंतीचे औचित्य साधून हा आठवडा पक्षी सप्ताह  म्हणून साजरा केला जातो.
कल्याण वनविभागाचे वनपाल मच्छिंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रोहित भोई यांनी वॉर रेस्क्यू टिमच्या स्वयंसेवकांसोबत अनेक ठिकाणी कारवाई करत भारतीय पक्षी जप्त केले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करून निर्सगमुक्त करण्यात आले तसेच वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी फेसबुक लाईव्ह, झुम ॲपलिकेशनव्दारे ऑनलाईन जनजागृती कार्यक्रम केले.  
गुरुवारी या सप्ताहाचा सांगता समारोप निमित्ताने पक्षांचे छायाचित्रे प्रदर्शन कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आयोजित केले होते. या प्रसंगी पडघा वनपरिक्षेत्रील वनपाल साहेबराव खरे (पक्षी निरीक्षक) यांनी पक्षांचे निर्सगातील महत्व तसेच त्याच्या संरक्षणाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.
सर्वसामान्य नागरिक स्वतःचा छंद जोपासण्यासाठी किंवा मुलांच्या हट्टापायी  पोपट, होला, सनबर्ड, मुनिया व इतर पक्षी भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये  संरक्षित केले आहे. याचे उल्लंघन झाल्यास किमान ३ वर्षे शिक्षा किंवा २५ हजार रुपये दंड भरावा लागतो अशी माहिती कल्याण वनपाल मच्छिद्र जाधव यांनी दिली.
कल्याण वनपरिक्षेत्रात जप्त केलेले ६ पोपट, १ ठिपकेवाला घोला तसेच वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी रेस्क्यू केलेले १ पानकावळा, २ घुबड, २ घार, एकुण १२ पक्षी निसर्गमुक्त केले. त्याच बरोबर १ भारतीय अजगर, १ मांडूळ, ३ घोणस, ४ नाग, ५ धामण,  १ घोरपड, १ भारतीय कासव (Flap shell Turtule) इतर वन्यजीव निर्सगमुक्त करण्यात आले.
यावेळी  कल्याण वनपाल मच्छिद्र जाधव, वनरक्षक रोहित भोई तसेच वॉर रेस्क्यू फाउंडेशनचे प्रेम आहेर, चंदन ठाकूर, रेहान मोतिवाला, फाल्गुनी दलाल, निखिल कांबळे, रोमेश यादव, स्वप्निल कांबळे, योगेश कांबळे व सुहास पवार उपस्थित होते.

 462 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.