ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष यांचे आवाहन
ठाणे : चैतन्य आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या दिवाळी या सणाला सुरुवात झाली आहे. यंदाचा प्रकाश उत्सव अर्थात दीपोत्सव साजरा करताना करोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्रिसूत्रीचे नियम पाळून दीपोत्सव आनंदाने साजरा करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केले.त्यांनी ग्रामीण जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
ही दिवाळी आपण सर्वांनी आपली वैयक्तिक, कौटुंबिक, आणि सामाजिक जबाबदारी समजून फटाकेविरहीत, प्रदूषणमुक्त, शासकीय नियमांचे आनंदाने पालन करीत उत्साहाने साजरी करूयात. जिल्हा परिषदेच्या कर्मचारी- अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या संकटाला मोठ्या धौर्याने तोंड दिले आहे. त्यामुळेच महामारीला आटोक्यात आणण्यात आपणाला यश आले. मात्र हा लढा अजून संपलेला नाही. सणाच्या काळात बाहेर जाताना हात वारंवार धुवा, तोंडाला मास्क लावा आणि सुरक्षित अंतर राखा. आपली आणि कुटुंबाची काळजी घ्या. शून्य कोरोना रुग्ण हे आपले ध्येय असून त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरु असून आपण त्यात नक्कीच यश मिळवू. असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
465 total views, 3 views today