पालिका रुग्णालयांची सुरक्षा वाढवा

आमदार गणेश नाईक यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

नवी मुंबई : वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अलीकडेच तोडफोड करण्यात आली. असे हल्ले कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची करीत असतात. भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी पालिका रुग्णालयांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे
नाईक यांची पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या समवेत सोमवारी कोरोना प्रतिबंध उपाय योजनावर नियमित आढावा बैठक बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी रुग्णालय तोडफोड प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया देत हल्लेखोर प्रवृतीचा निषेध केला. संबंधित रुग्णाच्या मृत्यूनंतर तोडफोड झाली. त्याचा मृत्यू कशामुळे झाला. त्या बाबत त्याच्या कुटुंबियाना कशा प्रकारे कळविण्यात आले होते. याची चौकशीची मागणी झाली तर ती अवश्य करावी मात्र रुग्णालयात जेथे अन्य रुग्णही असतात तेथे तोडफोड करणे याचे कधीही समर्थन करता येत नाही. असे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पालिका रुग्णालयांची सुरक्षा वाढवावी. सुरक्षा रक्षकासमवेत अतिरिक्त पोलीस नेमावे अशी सुचना त्यांनी केली. आयुक्त बांगर यांनी ही सुचना मान्य केली.
कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात नवी मंबई पालिका नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यावर्षी देखील पालिकेने पालिकेचे,परिवहनचे कायम, कंत्राटी, ठोक, मानधन अशा सर्व संवर्गातील कर्मचारी आणि अधिकारी याना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी नाईक यांनी केली. येत्या चार ते पाच दिवसात यावर निर्णय घेण्याची ग्वाही आयुक्त बांगर यांनी लोकनेते नाईक याना दिली. सानुग्रह अनुदान जाहीर करण्यापूर्वी परंपरेप्रमाणे महापौर यांच्याकडून प्रशासनाने निश्चित केलेल्या अनुदानात वाढ करण्यात येते. ही प्रथा या वर्षी देखील जपण्याचे आवाहन केले.
नाईक यांनी मागणी केल्याप्रमाणे महापालिकेने ३० हजार विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती वाटपाचे काम सुरु केले आहे. साडेचार हजार विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती वाटपाचे काम आता पर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्याना युद्ध पातळीवर शिष्यवृत्ती वितरण करावे, अशी सूचना नाईक यांनी केली असता आयुक्त बांगर यांनी त्यास होकार दर्शविला.
ऐरोली येथे होल्डिंग पोंडमध्ये एका ठेकेदाराने भराव केला आहे. या प्रश्नी माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी नाईक यांच्या माध्यमातून आयुक्त बांगर याना अवगत केले असता या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नाईक यांनी आयुक्ताकडे केली
आजच्या आढावा बैठकीत नाईक यांच्या सोबत माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, वैभव नाईक हे मान्यवर तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते.

 308 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.