कोकणातील वादळग्रस्तांना आर्थिक मदत आणि शाळांना संगणक

आमदार संजय केळकर यांचा पुढाकार

ठाणे: निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील दुर्गम भागात प्रत्यक्ष पाहणी करुन कोकण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने वतीने येथील १० शाळांना गेल्या एक महिन्यात १० संगणक उपलब्ध करुन देण्यात आले. तर कष्टकरी वर्गातील व्यावसायिकांना १० हजार रुपयांची मदत देण्यात आली.
कोकण विकास प्रतिष्ठान या संस्थेचे आमदार संजय केळकर हे अध्यक्ष असून संस्था १९७८ साली स्थापन झाली. विविध स्तरावर ही संस्था उल्लेखनिय कार्य करत आहे. कोरोनाचे संकट आणि निसर्ग वादळामुळे कोकण भागातील जनजीवन उद्ध्वस्त झाले. शाळांचेही अतोनात नुकसान झाले. कोकण विकास प्रतिष्ठान अध्यक्ष, आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने या भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
आमदार केळकर आणि संस्थेने दापोली, मंडणगड तालुक्यातील हर्णे आणि विरसई या दुर्गम भागातील २०० गरजू गरीब, शिंपी, चर्मकार, नाभिक, छोटे दुकानदार अशा कष्टकरी व्यवसायिकांना १० हजाराचे मदतीचे धनादेश दिले. तर दुर्गम भागातील १० शाळांना संगणक देऊन शैक्षणिक कार्यात हातभार लावला.

 479 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.