बॉलिवूडने सतत ‘हिंदुफोबिया’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांना खतपाणी घातले


‘…और कितनी हिन्दू बहने लव जिहाद की बली चढेगी ?’ या विषयावरील परिसंवादात बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी यांचे परखड वक्तव्य

मुंबई : बॉलिवूडमध्ये एकमेकांना ‘इन्शाअल्लाह’ असे सर्रास म्हटले जाते; पण ‘जय श्रीराम’ म्हटल्याचे मी ऐकलेले नाही. बॉलिवूडमधील खान मंडळींनी हिंदू महिलांशी लग्न करून अप्रत्यक्षपणे ‘लव्ह जिहाद’लाच प्रोत्साहन दिले आहे. ‘तनिष्क’ आणि ‘सर्फ एक्सेल’ यांसारख्या जाहिराती ‘लव्ह जिहाद’ची उदाहरणे आहेत. ‘लव्ह जिहाद’विषयी बोलायलाच हवे. हिंदु जनजागृती समितीच्या या कार्यक्रमातून हिंदूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. नसिरुद्दीन शाहसारखे लोक ‘पाकिस्तानमध्ये राहायला चांगले वाटते’, असे म्हणतात. या लोकांसाठी हिंदूंच्या हत्येचे काहीही मूल्य नाही. यांचा हा कोतेपणा उघड करायलाच हवा. बॉलिवूडमधील हिंदूंना त्यांच्या धर्माविषयी अभिमान वाटत नाही. बॉलिवूडने सतत ‘हिंदुफोबिया’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांना खतपाणी घातले आहेे, असे रोखठोक प्रतिपादन हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पायल रोहतगी यांनी केले. ‘लव्ह जिहाद’मुळे हरियाणातील निकिता तोमर हिची हत्या झाल्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने ‘…और कितनी हिन्दू बहने लव जिहाद की बली चढेगी ?’ या विषयावर विशेष संवाद आयोजित केला होता. त्यामध्ये त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम फेसबूक आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमांतून ३२०८४ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर ६५९९० लोकांपर्यंत पोचला.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे म्हणाले की, हिंदु युवती मुसलमान युवकाच्या प्रेमात पडली, तर चालते. मग ‘राहुल राजपूत’हा हिंदु युवक एखाद्या मुसलमान युवतीवर प्रेम करत असेल, तर त्याला का ठार मारले जाते ? तेव्हा कुठे जातो तुमचा ‘सेक्युलरवाद’? जर करिना कपूर सैफ अली खानशी लग्न करत असेल, तर ‘तैमूर’च जन्माला येणार. हिंदूंना छत्रपती शिवाजी महाराज हवे असतील, तर त्यांना जन्म देणार्‍या जिजामाता सिद्ध व्हायला हव्यात. निकिता तोमर हिला न्याय देण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला हवे. ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी देशात ‘निकिता कायदा’ व्हायला हवा. केरळ येथील आर्ष विद्या समाजम्च्या श्रुती ओ. यांनी, ‘केरळमध्ये लव्ह जिहादची माहिती असलेली ४ हजारांहून अधिक प्रकरणे आहेत. ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या मुलींना आम्ही एका पाठ्यक्रमाद्वारे धर्मशिक्षण देऊन परत आणले आहे. धर्मशिक्षणच मुलींना ‘लव्ह जिहाद’पासून वाचवू शकते’ असे सांगितले. हिंदु हेल्पलाईन’चे प्रांत महामंत्री बिनील सोमसुंदरम् म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’ ही आतंकवाद्यांकडून पोसली जाणारी एक कार्यप्रणाली आहे. यात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या संघटना कार्यरत आहेत. केरळ उच्च न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’द्वारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी कायद्याची आवश्यकता प्रतिपादिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता अमिता सचदेवा म्हणाल्या, ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’मुळे धर्मांधांना मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ करतांना त्यांच्या मनात कायद्याची भीती नाही. देहली येथील *हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या प्रवक्त्या प्रा. संदीप कौर मुंजाल म्हणाल्या की, ३० वर्षांपासून मी प्राध्यापक आहे. धर्मांध मुले ‘लव्ह जिहाद’साठी प्रयत्नशील असतात; पण हिंदु पालकांना ‘लव्ह जिहाद’विषयी माहिती नसते. त्यामुळे त्यांचे फावते.

 337 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.