सेन्सेक्स, निफ्टीची सलग चौथ्या दिवशी विजयाची मालिका कायम

चांगल्या सुरुवातीनंतर जागतिक बाजारातील उदासीनतेमुळे आणि प्रॉफिट बुकिंगमुळे झाली होती घसरण

मुंबई : अस्थिरतेमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने आजच्या व्यापारी सत्रात ‘U’ आकाराचे वळण दर्शवले. मार्केट आज १ टक्क्यांची वृद्धी घेत सुरू झाले. मात्र जागतिक बाजारातील उदासीनतेमुळे आणि प्रॉफिट बुकिंगमुळे नंतर घसरण सुरू झाली. सेन्सेक्सने ५०० अंकांची घसरण सुधारण्यासाठी ७०० अंकांची वृद्धी घेतली. ०.४० टक्क्यांच्या वृद्धीसह तो ४०.७०७.३१ अंकांवर स्थिरावला. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज मेटल आणि रिअॅलिटी स्टॉक्सच्या स्वरुपात बाजाराला आधार मिळाला. तर दुसरीकडे निफ्टीने दिवसाच्या सुरुवातीला १२००० ची पातळी गाठली. नंतर दिवसाच्या अखेरीस तो ०.३४ टक्के वृद्धीसह ११,९३७.६५ रुपयांवर स्थिरावला.
सेन्सेक्स : ३० स्टॉकच्या बॅरोमीटरने २० स्टॉकमध्ये प्रगती केली तर १० मध्ये घसरण दिसून आली. नफ्याचे नेतृत्व पॉवरग्रिड (४.१३%), भारती एअरटेल (३.५१%), टाटा स्टील (३.०४%) आणि एनटीपीसी (२.११%) यांनी केले. टीसीएस (२.३०%), एचसीएल टेक्नोलॉजीज (१.०६%) आणि टेक महिंद्रायासारखे टेक स्टॉक्स तसेच नेस्ले (१.४६%), बजाज फायनान्स (०.८८%) आणि बजाज फिनसर्व्ह (०.७५%) यांनी नुकसानीचे नेतृत्व केले. आरआयएलनेही प्रारंभिक नफा गमावून १.५० टक्क्यांची घसरण घेत विश्रांती घेतली. बँकिंग आणि पॉवर हे आज सर्वाधिक व्यापार झालेले स्टॉक्स ठरले. एसबीआय (०.४२%) आणि एनटीपीसीने या क्षेत्राचे नेतृत्व केले.
निफ्टी : निफ्टी५० च्या ५० स्टॉक इंडेक्समध्ये ३० स्टॉक्सनी नफा कमावला तर २० स्टॉक्स घसरले. नफ्याचे नेतृत्व पॉवर ग्रिड (४.१७%), भारती एअरटेल (३.४६%), टाटा स्टील (२.९७%) आणि हिंडाल्को (२.८५%) इत्यादींनी केले. तर नुकसानीचे नेतृत्व ब्रिटानियाने केले. कंपनीचे स्टॉक्स ४.३९% नी घसरले. लाल रंगात स्थिरावलेल्या इतर स्टॉक्समध्ये टीसीएस (२.३२%), एसबीआय लाइफ इन्शुरन्स (१.९२%) आणि हिरो मोटोकॉर्प (१.८३%) यांचा समावेश झाला.
रिअॅलिटी आणि मेटल : एनएसईमध्ये रिअॅलिटी आणि मेटल या क्षेत्रांना बाजाराचा आधार मिळाला. निफ्टी रिअॅलिटीच्या एकूण ८ स्टॉक्सनी नफा कमावला तर २ स्टॉक्स घसरले. निफ्टी मेटलमधील १२ स्टॉक्सनी नफा कमावला तर ३ स्टॉक्स घसरले. निफ्टी रिअॅलिटीने ४.३६% नफा कमावला. गोदरेज प्रॉपर्टीज आणि सोभा डेव्हलपर्स या स्टॉक्समध्ये अनुक्रमे ११.५० टक्के आणि ११.२२ टक्के वृद्धी झाली. मेटल सेगमेंटमध्ये एपीएल अपोलो ट्युब्स, हिंदुस्तान झिंक आणि जेएसपीएल स्टॉक्समध्ये अनुक्रमे ५.५५%, ४.६०% आणि ४.३२% ची वाढ झाली.
एफएमसीजी आणि आयटी: आजच्या व्यापारी सत्रात एफएमसीजी हा सर्वात खराब कामगिरी करणारा निर्देशांक ठरला. या क्षेत्राने ०.९४% ची घसरण अनुभवली. सर्वाधिक तोटा झेलणाऱ्यांमध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीज (४.३९%), टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (२.६४%), कोलगेट पाामोलिव्ह (२.३४%) आणि डाबर इंडिया (२.३१%) यांचा समावेश होता. तर युनायटेड स्पिरिट्सचे शेअर्स अपवादात्मकरित्या १.२८% नी वाढले. आयटी स्टॉक्सनीही आज घसरण घेतली. माइंडट्रीने ५.०७%, टीसीएसने २.३२% आणि एचसीएल टेक्नोलॉजीजने ०.९८% ची घट अनुभवली.
जागतिक बाजारात कमकुवत संकेत: युरोप व उत्तर अमेरिकेतील कोरोनाची दुसरी लाट तसेच अमेरिकेच्या मदत पॅकेजबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजाराने कमकुवत संकेत दर्शवले.

 370 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.