खर्डी जवळील आदिवासी पाड्यात वीज पडून २५ जखमी

खर्डी रुग्णालयात उपचार सुरू;माजी आमदार व नायब तहसीलदारांनी दिली भेट.

शहापूर : सुमारे दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने व विजांच्या कडकडाटाने शहापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे.मंगळवार,२० ऑक्टोबर रोजी शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील फणसपाडा या आदिवासी वस्तीतील भिका भाऊ थोराड यांच्या घरावर रात्री ७.३० च्या दरम्यान वीज पडल्याने घरातील व परिसरातील २५ रहिवाशी जखमी झाले आहेत.या विजेमुळे घरावरील लाकडी वासे जळून गेले असून कुठलीही जीवितहानी झाली नाही.या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा,जि.प.चे कृषी सभापती संजय निमसे, जि.प.सदस्य विठ्ठल भगत, शिरोळचे उपसरपंच सचिन निचिते, सेनेचे तालुका संपर्कप्रमुख गणेश राऊत,प्रशांत खर्डीकर यांनी खर्डी येथील दवाखान्यात जखमीची भेट घेऊन विचारपूस करून आधार दिला
शहापूरचे नायब तहसीलदार दयाराम वळवी यांनीही जखमी रुग्णांची भेट घेतली व सर्व रुग्ण स्थीर असल्याचे सांगितले

 312 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.