केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले अतिवृष्टीग्रस्तांची भेट घेणार

        

गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार

मुंबई :  अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यात ओल्या  दुष्काळाचे संकट उभे ठाकले  आहे. अस्मानी संकटाने उध्वस्त झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांची  लवकरच भेट घेऊन त्यांचे अश्रू पुसण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे उद्या  गुरुवार , २२ ऑक्टोबर रोजी  पुणे, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
कोरोना महामारीच्या संकटात आता ओल्या दुष्काळाची भर पडली आहे. अतिवृष्टी झालेल्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये शेतकरी शेतमजूर सर्वच घटक उध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टी च्या आपत्तीत सापडलेल्यांची भेट घेऊन त्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले  गुरुवारी ऑक्टोबर रोजी दिल्लीतून थेट पुण्यात येणार असून पुण्यातून बारामती; सातारा जिल्ह्यातील फलटण त्यांनंतर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि सांगली जिल्ह्यातील जात तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना  भेटी देणार आहेत. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे यांनी दिली आहे.

 316 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.