शाळेच्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्वस्पर्धा, नृत्य, लेझीम, रिले, धावणे , खो -खो,स्काऊट गाईड , शिष्यवृत्तीपरीक्षा या गुणवत्ता, कला व खेळ प्रकारात जिल्हास्तरापर्यंत आपला ठसा उमटवला आहे.
शहापूर : शहापूर तालुक्यातील अस्नोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सन २०२० च्या शिष्यवृत्ती परीक्षेत सालाबादप्रमाणे याही वर्षी इ. ५ वी चे तब्बल २७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
यात शुभम शिवाजी दिनकर, प्रणाली पुंडलिक दिनकर, दिव्या विलास गवाळे, पूर्वा सुनिल जाधव, आदिती भरत निपूर्ते , हर्ष दिनेश सोनावळे , आशूतोष अनंता बांगर , हर्षल आनंता रेवणे ,तन्मय कैलास सातपूते , रिना भगवान आगिवले ,कु. सचिन नारायण दिनकर ,विवेक विष्णू दिनकर , दर्शन सोमनाथ दिनकर , रोशनी पुंडलिक सोनावळे , मयूर पंढरीनाथ दिनकर ,तन्मय कशोर विशे , राज शिवाजी सातपूते , धनश्री गोविंद दवणे , चंदना यशवंत सातपूते , मालती रामचंद्र निपूर्ते , दर्शन पुंडलिक दिनकर , जिनल यशवंत निपूर्ते , यज्ञा मनोहर निपूर्ते , तेजस शंकर दिनकर , तुषार बळीराम वाघ , मानसी अरविंद सोनावळे, भावेश दिनेश दिनकर या विद्यार्थ्यांचा सामावेश असून शिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे,
विस्तार अधिकारी शिवराम वेखंडे,
केंद्रप्रमुख डॉ .राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक सुदाम रणदिवे,राजेश सापळे, पुंडलिक पडवळ वर्गशिक्षक बाळू भेके,सहशिक्षक महादू कनकोसे,विजय पाटील,नवनीत फर्डे, संजय भेरे,सरीता पाटील ,गणेश हरड,शुभांगी मस्के यांनी अथक परिश्रम घेतले.
अस्नोलीच्या शाळेने मंथन प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती परीक्षा,क्रिडास्पर्धा , सांस्कृतिक स्पर्धा, महिलांसाठी पैठणी, हळदी कुंकू,मंगळागौर ,महिला मेळावा,पालक मेळावा,योगावर्ग अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले असून वक्तृत्वस्पर्धा, नृत्य, लेझीम, रिले, धावणे , खो -खो,स्काऊट गाईड , शिष्यवृत्तीपरीक्षा या गुणवत्ता, कला व खेळ प्रकारात जिल्हास्तरापर्यंत आपला ठसा उमटवला आहे.
472 total views, 3 views today