अवैध रेती उपसा व वाहतुकीसाठी वापरलेल्या पाच बोटी केल्या नष्ट

शहापूरच्या तहसीलदार निलीमा थिटे यांची कारवाई

शहापूर (शामकांत पतंगराव) : शहापूर तालुक्यातील टेंभा गावाजवळील वैतरणा धरणातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती उपसा होत असून वाहतूक होत असून तहसीलदारांनी या ठिकाणी धाड टाकून पाच बोटी जप्त केल्या होत्या त्या आज कटरच्या सहाय्याने नष्ट केल्या असून रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.
शहापूरच्या तहसीलदार निलीमा सूर्यवंशी यांनी काल(दि.१९)
वैतरणा धरणाच्या पात्रातून बेकायदा रेती उपसा होत असलेल्या ठिकाणी धाड टाकून धाडसी कारवाई केली आहे.
अवैध रेती उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेल्या ११ बोटी पैकी पाच बोटी पकडल्या असून बाकीच्या सहा बोटी अनधिकृत रेती उपसा करणाऱ्यानी पाण्यात बुडवल्या होत्या.आज(दि.२०) त्या पाचही बोटी कटरच्या सहाय्याने कापून नष्ट करण्यात आल्याचे तहसीलदार नीलिमा सुर्यवंशी यांनी सांगितले.
याप्रकरणी तहसीलदार सुर्यवंशी यांनी मुबई महापालिका आयुक्त, उप वनसंरक्षक शहापूर आणि सहा.वनसंरक्षक, वन्यजीव शहापूर यांना विस्तृत पत्र लिहून मुंबई महापालिका कार्यक्षेत्र, तसेच वनविभाग यांचे कार्यक्षेत्रात अनधिकृत बोटीच्या सहाय्याने अवैध रेती उपसा व वाहतूक करून जवळच अवैध साठा व वाहतूक केली जाते याकडे व वनविभागाच्या जमिनीवर अनधिकृत रित्या रस्ता बांधण्यात आला याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. याच पत्रात याप्रकरणी शहापूर पोलीस स्टेशन मध्ये १२ मे २०१५, २४ मार्च आणि २८ आक्टोबर २०१८ रोजी तीन गुन्हे नोंदविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अवैध रेती वाहतूक करण्यासाठी वैतरणापाडा येथील हनुमान मंदिर ते मोडकसागर तलावापर्यंत २१हजार ३५२ ब्रास माती या गौणखनिजाचा वापर करण्यात आला आहे आणि त्याचा दंड म्हणून २२ कोटी २२ लाखावर रक्कम ज्याच्यावर गुन्हा सिद्ध होईल त्यांच्याकडून वसूल केला जाईल असे तहसीलदार यांनी सांगितले.
या पत्रानंतर मात्र सोमवार, मंगळवार अशा सलग दोन दिवस महापालिका सुरक्षा विभाग, वन विभाग व महसूल विभाग यांची संयुक्त कारवाई करण्यात आली आणि पाच बोटी आणि एक ट्रक जप्त करण्यात आला. वनविभागाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या रस्ता उखडण्याचे काम वनविभागाने सुरू केले आहे.
बुडविण्यात आलेल्या बोटी महापालिका कर्मचारी वर काढून नष्ट करतील असे तहसीलदार नीलिमा सुर्यवंशी यांनी सांगितले व तसे पत्र महापालिका संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ओळ्खपत्रावर पश्चिम बंगालचर पत्ते असलेले कामगार धरण क्षेत्रातील सवेदनशील भागांत राहत असतील तर ही खूपच चिंतेची बाब आहे अशी येथे चर्चा आहे.
दरम्यान शहापूरच्या तहसीलदार निलीमा सुर्यवंशी यांच्या या धाडसी कारवाईने शहापूर तालुक्यातील रेती माफियांमध्ये खळबळ माजली असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे

 644 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.