महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असतील.

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत शासकीय सदस्य म्हणून काम पाहतील. शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, उद्योजक बाबा कल्याणी, क्रिकेटर संदिप पाटील आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर अशासकीय सदस्य म्हणून या समितीत असणार आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समिती शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षे कालावधीसाठी किंवा समितीची पुनर्रचना यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत कार्यरत असेल.

 491 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.