उत्सवानिमित्त स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीला दिले देवी कळूबाईचे रूप
ठाणे : ठाण्यातील नामदेववाडी,पाचपाखडी येथील श्रींस्वामी समर्थ मठात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे.
यंदा कोरोनाचे संकट असल्याने ठाण्यातील नामदेवाडी,पाचपाखाडी येथील साईदर्शन सोसायटीमध्ये असलेल्या स्वामी समर्थ मठात नवरात्र उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.याठिकाणी असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीला देवी कळूबाईचे रूप देण्यात आले.या मूर्तीची सजावट संतोष पवार,भारती कुळे,सविता चौधरी,शर्मिला मराठे यांनी केली आहे.यंदा कोरोना आल्याने मंदिर बंद असले तरी नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असून सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे.असे यावेळी मंदिराचे संस्थापक अनिल बोर्डे यांनी सांगितले.या कोरोना संकटातून महाराष्ट्र तसेच देशवासियांची मुक्तता कर असे मागणे देवीला मागितले असल्याचे बोर्डे यांनी सांगितले.
569 total views, 2 views today