स्नोकोरद्वारे उत्पादन श्रेणीचा विस्तार

टीडब्ल्यूएस श्रेणीत आयरॉकरगॉड्स इअरबड्स लॉन्च केले

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्सच्या स्नोकोर या ऑडियो ब्रँडने आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर टीडब्ल्यूएस श्रेणीत आयरॉकरगॉड्स इअरबड्स लॉन्च केले आहेत. यात पॉवरफुल १३ एमएम डायनॅमिक बास बूस्ट ड्रायव्हर असून हाय फिटेलिटी स्पीकर्सदेखील आहेत. यात उत्तम दर्जाचे पियू आणि टिटॅनिअम मॅगनेट आहेत, जे अतुलनीय आणि शक्तीशाली ध्वनीचा अनुभव प्रदान करतात. यातील अत्याधुनिक एटीएस ३०१५ चिपद्वारे बॅटरीचा कमी वापर होतो तसेच तत्काळ आणि निरंतर कनेक्शन मिळते. क्लासिक व्हाइट प्रकारात उपलब्ध आयरॉकरगॉड्स १९९९ रुपयांच्या आकर्षक किंमतीत फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत.
इअरबड्समध्ये v5.0 ब्लूटूथ असून ते गर्दीच्या वातावरणातही वाढीव रेंज, निरंतर व मजबूत कनेक्शन प्रदान करते. यूझर्स इअरबड्सद्वारे एचडी कॉलिंगचा आनंद देऊ शकतात. तसेच केस ओपन करताच आपोआप कनेक्ट होतात. दोन्ही बड्समध्ये स्वतंत्र चिप डिझाइन असून त्यात अखंडपणे सिंगल किंवा डबल इअरफोनमध्ये स्विच करता येते. आयरॉकरगॉड्स हे इंटेलिजंट टच कंट्रोल फीचरसह येत असून त्याद्वारे यूझर्स एकदा टॅप करून प्ले/पॉझ आणि दोनदा टॅप करून पुढील गाण्यावर जाऊ शकतात. दरम्यान, गूगल आणि सिरी व्हॉइस असिस्टंट असलेले इअरबड्स साध्या व्हॉइस कमांडद्वारेही फोनला कनेक्ट होऊ शकतात.
आयरॉकरगॉड्स मध्ये 500mAh + 35mAh* च्या दोन बॅटरीज असून त्याद्वारे२४ तास प्लेटाइम मिळतो. हे केस दोन तासात ५ पट वेगाने पूर्ण चार्ज होते. तर इअरबड्सची बॅटरी एका तासात चार्ज होते. एकदा चार्ज केल्यावर इअरब्डस ४ तास गाणे ऐकण्याची तसेच ४ तास बोलण्याची सुविधा प्रदान करते. आयरॉकरगॉड्स टीडब्ल्यूएस इअरबड्स हे एक वर्षाच्या वॉरंटीसोबत येतात.

 391 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.