ठाण्यातील बेपत्ता सीएचा मृतदेह टिटवाळा रेल्वे रूळालगत आढळला

कंपनीतील तब्बल चार हजार कोटीच्या घोटाळा प्रकरणी झाली होती E O W चौकशी

कल्याण : ठाण्यात नौपाडा येथे राहणारे सी.ए. ११ तारखेपासुन बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह टिटवाळा रेल्वे स्थानकनजीक रेल्वे रूळा लगत आढळल्याने त्यांच्या मुत्युचे गूढ निर्माण झाले आहे.   
नौपाडा येथे राहणारे  सागर सुहास देशपांडे वय (३८) वर्षे हे मुंबईतील “काँक्स् अँन्ड किंग्ज लिमिटेड ट्नर माँडीसन या आंतरराष्ट्रीय टुर्स कंपनीत लेखापालाचे काम पाहत होते. या कंपनीच्या तब्बल चार हजार कोटीच्या घोटाळा प्रकरणी E O W चौकशी केल्याचे समजते. सागर देशपांडे हे ११आँक्टोबर रोजी टिटवाळ्याला जाऊन येतो असे सांगून मोटार कारने कंपनीच्या टिटवाळा येथील कार्यालयाकडे गेल्याचे पुढे येत असुन त्यांच्या घराच्यांनी ते बेपत्ता असल्याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली असुन सागर देशपांडे यांचा मृतदेह १२ आँक्टोबर रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास टिटवाळा स्टेशन नजीक रेल्वे रुळालगत आढळल्याने त्या़चे बेपत्ता होणे, मृतदेह टिटवाळा रेल्वे रूळालगत आढळल्याने हा अपघात की, घात कि  आत्महत्या असे गूढ निर्माण झाले आहे.
 कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी अकस्मित मुत्युची नोंद केली असून लोहमार्ग पोलीसांनी मृतदेहाची ओळख पटण्याकामी सुत्रे हालवली असता १७ आँक्टोबर रोजी नौपाडा पोलिसांनी हा बेपत्ता सागर देशपांडे यांचा असल्या बाबत दुजोरा दिला. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी  सागर देशपांडे  मृतकाच्या वारसाचे जबाब नोंद घेण्याचे सुरू असल्याचे तसेच सागर याची वॅगनार गाडी टिटवाळा रेल्वे स्थानकालगत आढळल्याबाबत तपास सुरु असल्याचे लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी सांगितले.

 466 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.