लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीला भररस्त्यात बेदम मारहाण

पोलिसांनी आरोपीला केली अटक

कल्याण :  विवाहित असताना पत्नीला काही दिवसांपूर्वी घटस्फोट दिला. मात्र  प्रेयसीने लग्नास नकार दिला म्हणून भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या प्रियकारास महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.                             
कल्याण पुर्वैतील कचोरे परिसरात राहणारी तरूणी सर्वदय माँल मध्ये इन्शुरन्स कार्यालयात काम करते. तिचे काम आटपून ती माँलच्या खाली शुक्रवारी संध्याकाळी उभी असता अजित कनोजिया याने तुझ्या साठी बायकोला सोडले आहे. तू आत्ता लग्नाला का नकार देतेस असे बोलून प्रियसी तरूणीला भर रस्त्यात हज्जुत घालत   बेदम मारहाण केली. तर काही नागरीकांनी अजित यांस पकडले. मात्र तो पळून गेला.
अजित कनोजिया याचे काही वर्षापासून या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. अजित हा विवाहित आहे. विवाहित असताना या तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. काही दिवसापूर्वी आपल्या या प्रेयसीसाठी अजितने आपल्या पत्नीला सोडले होते. पत्नीला सोडल्यानंतर या तरुणीला वारंवार लग्नासाठी गळ घालत होता. तरुणीने त्याला लग्नासाठी नकार दिला. तुझ्यासाठी बायकोला सोडले आहे. तू आत्ता लग्नाला का नकार देते असे विचारले. त्यावरुन त्यांच्या वाद झाला. या वादातून त्याने तिला मारहाण केली.
 या प्रकरणी तरुणीने महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने एपीआय दिपक सरोदे यांच्या पथकाने आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

 452 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.