ग्लोबल रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी ऑनलाइन योगा वर्ग

महापौर नरेश म्हस्के यांची संकल्पना

ठाणे : कोरोना रुग्णांसाठी आणि महापालिकेचे तर्फे सुरू करण्यात आलेल्या ग्लोबल रुग्णालयात आता महापौर नरेश म्हस्के यांच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त डाँ बिपिन शर्मा यांनी ऑनलाईन योग वर्ग सुरू केले आहेत. कोरोना आजार श्वसनाशी निगडीत असल्यामुळे योग आणि प्राणायाम याचा फायदा रूग्णांना होत असल्यामुळे ठाण्यातील घंटाळी योग मित्र मंडळाच्या सहकार्याने हे वर्ग सुरु करण्यात आले आहेत.
या आँनलाईन योगवर्गाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर, योगशिक्षक श्रीकृष्ण म्हस्कर गुरुजी, गणेश अंबिके आदी उपस्थित होते.
कोविड१९ या आजारावर अद्याप लस आलेली नाही मात्र या आजारावर भारतीय उपचार पद्धती अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसून येते आहे. त्याचा वापर विविध स्तरावर करण्यात येतो आहे.
यामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी, यासोबत प्लाझ्मा आणि योग साधना हेसुद्धा प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. कोरोना आजार श्वसनाचा आजार असल्याने रुग्णांना लागण झाल्यास श्वसनाला त्रास होतो व आजार बरा झाल्या नंतरही श्वसन यंत्रणा पुर्ववत होण्यास विलंब होतो. यावर योग, आणि प्राणायम उपयुक्त ठरत असून श्वसन यंत्रणेचे हे व्यायाम रुग्णांना कोविड मधून बरे करण्यात मदत करतात. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या बाळकुम येथील ग्लोबल रुग्णालयामध्ये ऑनलाइन पद्धतीने योग्य वर्ग घेण्यात यावेत अशी सुचना महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी मांडली ती प्रशासनाने मान्य करून १७ ऑक्टोबर पासून ऑनलाइन पद्धतीने हे योग वर्ग सुरू केले आहेत. ओमकार, प्राणायम, योगाची सोपी आसणे रुग्णांकडून करुन घेतली जात आहेत. ठाण्याच्या अंबिका योग कुटीरचे योग प्रशिक्षक हे वर्ग रोज संध्याकाळी ऑनलाइन पद्धतीने घेतात. या निमित्ताने रुग्णांशी संवाद साधून त्यांचे मानसिक आरोग्य व मनोधैर्य वाढविण्यात येत असल्याचे ही योग प्रशिक्षक गणेश अंबिके यांनी सांगितले. या उपक्रमाला रुग्णांकडून ही चांगला प्रतिसाद मिळत असून याचे सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसात दिसतील, योगाचा रुग्णांना नक्की फायदा होईल, असे महपौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.या योग वर्गाचा फायदा जास्तीत जास्त रूग्णांना व्हावा यासाठी उपायुक्त विश्वनाथ केळकर, ग्लोबल रूग्णालयाचे डॉ, अनिरुध्द माळगांवकर, घंटाळी योग मंडळाचे गणेश अंबिके विशेष मेहनत घेत आहेत.
दरम्यान, योग उपचार पध्दती श्वसनाच्या आजारावर उपयुक्त ठरत असून जे रुग्ण कोविड आजारातून नुकतेच बरे होऊन घरी गेले आहेत किंवा होम कोरंटाईन आहेत अशा रुग्णांनी सुद्धा योगा करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

 326 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.