नवरात्र मंडळांना पोलिसांकडून मार्गदर्शन

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार उत्सव साजरा करण्याचे केले आवाहन

शहापूर : शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील गावांतील नवरात्र उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना या वर्षीचा नवरात्र उत्सव अत्यंत साधेपणाने व गर्दि टाळुन करा असे आवाहन किन्हवली पोलिस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक दिपक धनावटे यांनी केले आहे.
शनिवार( दि.१७)पासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवा दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे या साठी किन्हवली पोलीस ठाण्यात आज(दि.१५)नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलिस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची एक बैठक आयोजीत करण्यात आली होती.
नवरात्र साजरी करताना गरबा दांडिया,सांस्कृतिक कार्यक्रम किंवा गर्दी होईल असे कुठलेच कार्यक्रम करू नयेत.आरती करताना सर्वांनी सामाजिक अंतर राखावे,प्रसाद वाटताना हात स्वच्छ असावेत,सॅनीटायझर लावून आरती घेऊ नये,विनाकारण लाऊड स्पीकर लावू नये,गर्दि करून भजन वा जुगार खेळू नये,विसर्जन मिरवणुका काढू नयेत,कोरोनाचा समूह संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनी खबरदारी घ्यावी,शक्य झाल्यास आरोग्य विभागाची परवानगी घेऊन रक्तदान शिबिरे घ्यावीत आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे,ज्या मंडळाकडून नियमनाचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक दिपक धनावटे यांनी बैठकीत सांगितले.

 516 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.