दुर्मिळ नवरंग पक्षी उष्माघातामुळे जखमी

पक्षिमित्र महेश बनकर करतायेत त्याच्यावर उपचार. हा पक्षी दक्षिणेकडून विणीसाठी येत असतो. मे ते ऑगस्ट हा या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे दक्षिण भारतातून ते गौताळामध्ये येत असतात.

कल्याण : नऊ रंगांची छटा असलेला आणि सुरेल शीळ वाजविणारा नवरंग पक्षी उष्माघातामुळे जखमी झाल्याची घटना कल्याण मधील वायले नगर येथे घडली असून पक्षिमित्र महेश बनकर यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले आहेत.
हा पक्षी दक्षिणेकडून विणीसाठी येत असतो. मे ते ऑगस्ट हा या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे दक्षिण भारतातून ते गौताळामध्ये येत असतात. ऑगस्टनंतर ते पुन्हा दक्षिण भारतात जातात. झुडपी, जंगले, पानझडी जंगले ही ठिकाणे आवडती असल्याने मुख्यत: या ठिकाणी जमिनीवर उडय़ा मारत फिरताना आढळतो. म्हणून त्यास भुचरपक्षीसुद्धा म्हणतात.
नवरंग पक्षातील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. पाठीवर हिरवा, निळा, पोटावर व डोक्यावर पिवळा, डोळय़ापाशी काळा, चोच लालसर, डोक्याचा खालचा भाग पांढराशुभ्र, पिसे हिरवी, निळी, लाल, नारंगी रंगाची अशा प्रकारे विविध रंग या पक्ष्याला असतात. हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असून भुंड्या शेपटीचा आहे. त्याचा पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरमिजी असतो. नवरंग पक्षी उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात.

 372 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.