महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले उद्घघाटन
मुंबई : ना.म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे खेळणाऱ्या खेळाडूंना मोफत पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता शिवशक्ती महिला कबड्डी संघातर्फे बसविण्यात आलेल्या एक्वागार्ड चे उद्घघाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पार पडले.
महापौर पेडणेकर खेळाडूंना मार्गदर्शन करताना यावेळी म्हणाल्या की, पाणी हे जीवन असून शिवछत्रपती पुरस्कार संघटक राजेश पाडावे यांच्या माध्यमातून शिवशक्ती महिला कबड्डी संघातर्फे या ठिकाणी बसविण्यात आलेला एक्वागार्डचा लाभ खेळाडूंनी घेताना फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच याचा वापर करावा. शिवशक्ती महिला कबड्डी संघाचा देदिप्यमान इतिहास असून या मंडळातर्फे भविष्यकाळात उच्च प्रतीचे खेळाडू कसे तयार होतील, याकडे मंडळाने लक्ष द्यावे अशी सूचना महापौरांनी यावेळी केली. कबड्डी खेळाचे वैभव तुम्ही सर्व खेळाडूंनी टिकवून ठेवावे तसेच मंडळाने यापुढेही असेच सामाजिक कार्य चालू ठेवावे, असे प्रशंसोद्गगार महापौरांनी यावेळी काढले.
509 total views, 3 views today