मागील तीन वर्षांपासून रखडलेली नगरसेवक निधी मधील कामे आणि परिशिष्ट १ मधील कार्यदेश दिलेली विकास कामे तातडीने सुरू करण्याची केली मागणी
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक निधी मंजूर करून रखडलेली विकासकामे पूर्ण व्हावीत यासाठी भाजपा नगरसेवकांनी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला.
कल्याण डोंबिवली महापालिकेत विकास कामे मागील तीन वर्षांपासून रखडली आहेत. मागील तीन वर्षांपासून रखडलेली नगरसेवक निधी मधील कामे आणि परिशिष्ट १ मधील कार्यदेश दिलेली विकास कामे तातडीने सुरू व्हावीत या मागणीसाठी आज पालिकेच्या विरोधी पक्षनेते राहुल दामले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नगरसेवकांनी मुख्यलयात ठिय्या मांडला होता. प्रशासनाने दखल घेत तातडीने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी दामले यांनी केली आहे. यावेळी या ठिय्या आंदोलनात भाजपा आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.
491 total views, 1 views today