आपला प्रभाग, आपली जबाबदारी अंतर्गत नवी मुंबई शहरप्रमूख विजय माने यांनी राबवला उपक्रम
नवी मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या मोहिमे अंतर्गत माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत आज रविवारी प्रभाग ९६ मध्ये नवी मुंबई शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. त्या वेळेस महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
विजय माने यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ७ -८ महिन्यात सतत कार्यरत राहून २ वेळा सरसकट मोफत अन्नधान्य वाटप,मास्क वाटप, निर्जंतुकीकरण फवारणी,मास स्क्रिनिंग, मोफत आर्सेनिक गोळ्यांचे वाटप,मोफत रुग्णवाहिका सेवा आदी समाज उपयोगी उपक्रम राबवले होते.
627 total views, 1 views today