कोव्हीड हॉस्पिटलमध्ये दारू, तंबाखूजन्य पदार्थ नेणाऱ्या व्यक्तीवर पोलीस कारवाई

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट – तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा २००३ ( कोटपा ) अंतर्गत कडक कारवाई करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याकडून दंड वसूल करण्याबरोबरच फौजदारी कारवाई देखील करण्यात येते.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटलमध्ये काल रात्री दारू, तंबाखूजन्य पदार्थ नेणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा विभागाच्यावतीने पोलिसांच्या ताब्यात देऊन कोटपा-२००३ कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
काल ५ ऑक्टोबर रोजी कोव्हीड हॉस्पिटलमध्ये दारू, तंबाखू इत्यादी प्रतिबंधित वस्तू हॉस्पिटलमध्ये नेताना एका व्यक्तीस सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे व त्यांच्या सहकाऱ्यांच्यावतीने पकडण्यात आले. संबंधित व्यक्तीस उप आयुक्त केळकर यांच्यासमोर हजर करून त्याच्या सूचनेनुसार त्याला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट – तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा २००३ ( कोटपा ) अंतर्गत कडक कारवाई करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याकडून दंड वसूल करण्याबरोबरच फौजदारी कारवाई देखील करण्यात येते. सदर प्रकरणी कोटपा कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

 334 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.