मनसेच्या पाठपुराव्यामूळे ” सरस्वती इंग्लिश मिडियम स्कूलला ” महानगरपालिकेचा दणका !

पालकांच्या तक्रारी सबंधी शाळेच्या मुख्याध्यापिका, उप-मुख्याध्यापिका आणि शिक्षकांशी दोन, तीन वेळा बैठका घेऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले, परंतू शाळेचे प्रशासन सहकार्य करण्यास तयार नव्हते.

ठाणे : सरस्वती इंग्लिश मिडियम स्कूल, राबोडी मधील पालक शाळेच्या मनमानी कारभाराची तक्रार घेवून जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे आले होते. पालकांच्या तक्रारी सबंधी शाळेच्या मुख्याध्यापिका, उप-मुख्याध्यापिका आणि शिक्षकांशी दोन, तीन वेळा बैठका घेऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले, परंतू शाळेचे प्रशासन सहकार्य करण्यास तयार नव्हते.

अखेर आज ठाणे महानगर पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी या मुजोर शाळा प्रशासनाला आदेश काढून दणका दिला आहे. या आदेशामूळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचे आभार मानले आहेत.

 327 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.