अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना खड्डयात टाकले

विद्यार्थी भारतीचा सरकारवर आरोप

कल्याण : अंतिम सत्राच्या परीक्षा हा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात असताना अखेर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. अनेकदा पाठपुरावा करून ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने घर बसल्या परीक्षा देता यावी ही मागणी विद्यार्थी भारतीने पूर्ण करून घेतली आहे.
अंतिम सत्राच्या परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देताना लॉगिन होत नाही तर अनेकांना मेल येत नाहीत. युनिव्हर्सिटीच्या संकेस्थळावर सर्व्हरडाउन असते तर विद्यापीठाचे नंबर व्यस्त येतात. भेडसावणाऱ्या ह्या समस्यांना सामोरे जाताना विद्यार्थी मानसिक त्रासातून जातात. ह्या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांची गळती होऊन विद्यार्थ्यांना खड्डयात टाकले जात असल्याची आक्रमक भूमिका विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी घेतली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नाहीत त्यांना लवकरात लवकर पुन्हा परीक्षा देण्यात याव्यात अशी व्यवस्था करून द्यावी. शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आदेश देऊनही विद्यापीठे आपला मनमानी कारभार करीत आहेत. विद्यापीठांनी लगोलग ह्या परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा पत्रक जाहीर करून त्यांच्या घरापर्यंत पोहचून त्यांच्या परीक्षेची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी विद्यार्थी भारतीने केली आहे.

 265 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.