आठवड्याच्या सुरुवातीला निर्देशांक उच्चांकी स्थितीत

निफ्टी ८६.४० अंकांनी तर सेन्सेक्स २७६.६५ अंकांनी वधारला

मुंबई : आजच्या व्यापारी सत्राची सुरुवात तेजीने झाली असली तरी इंट्रा डेमधील नफा गमवावा लागला. अशा स्थितीतही बेंचमार्क निर्देशांक उच्चांकी स्थितीत स्थिरावले. निफ्टी ०.७६% किंवा ८६.४० अंकांनी वधारला आणि ११,५०० ची पातळी ओलांडत ११,५०३.३५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.७१% किंवा २७६.६५ अंकांनी वाढून ३८,९७३.७० अंकांवर स्थिरावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १२१३ शेअर्स घसरले व १४६१ शेअर्सनी नफा कमावला. तर १७३ शेअर्स स्थिर राहिले. टीसीएस (७.५५%), विप्रो (७.०१%), टाटा स्टील (४.९३%), सन फार्मा (३.३९%) आणि जेएसडब्ल्यू स्टील (३.१७%) हे निफ्टीतील टॉप गेनर्समध्ये समाविष्ट होते. तर दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह (२२.७९%), श्री सिमेंट्स (२.७५%), गेल (१.७५%), भारती एअरटेल (१.९५%) आणि बजाज फायनान्स (१.८३%) हे निफ्टीतील टॉप लूझर्समध्ये समाविष्ट होते.
आयटी, मेटल, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात खरेदी दिसून आली तर इन्फ्रा आणि एनर्जी क्षेत्राचा निर्देशांक घसरलेला दिससून आला. बीएसई मिडकॅप ०.१८% नी तर बीएसई स्मॉलकॅप ०.३८% नी घटलेला दिसून आला.
जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड: कंपनीने तिच्या संपूर्ण मालकीच्या सहाय्यक कंपनी पेरिमा होल्डिंगसाठी अनेक वित्तीय पर्यायांचा विचार केल्याचा अहवाल दिल्यानंतर जेएसडब्ल्यू स्टीलचे स्टॉक्स ३.१७ % नी वाढले व त्यांनी २९१.०० रुपयांवर व्यापार केला.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड: रिलायन्स इंडस्ट्रिजनंतर टीसीएस ही भारतातील दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी फर्म बनली आहे. कंपनीने १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे बाजारमूल्य प्राप्त केलेले आहे. परिणामी, कंपनीच्या शेअर्समध्ये ७.५५% ची वाढ झाली व त्यांनी २,७१३.९५ रुपयांवर व्यापार केला.
इन्फोसिस लिमिटेड: इन्फोसिस लिमिटेडने गाइडव्हिजन विकत घेतली असून ती युरोपमधील सर्व्हिस नाऊ इलाइट पार्टनर्सपैकी एक आहे. मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी ही कंपनी ओळखली जाते. ही पुरस्कार प्राप्त कंपनी धोरणात्मक सल्ला, समुपदेशन, अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि इतर सपोर्ट सर्व्हिस प्रदान करते. इन्फोसिस लिमिटेडच्या शेअर्समध्ये २.९४% ची वाढ होऊन त्यांनी १०४७.६० रुपयांवर व्यापार केला.
डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरीज लि.: फार्मा कंपनीने विज्ञान आधारीत उपक्रम व्यवसायात प्रवेश केला असून विज्ञान आधारीत उद्दिष्ट निशश्चित करणारी ती भारतातील पहिली आणि आशियातील तिसरी फार्मा कंपनी ठरली आहे. कंपनीचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याचे उद्दिष्ट कंपनीने निश्चित केले आहे. कंपनीचे स्टॉक्स १.३७% नी वाढले व त्यांनी ५१८१.९५ रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये खरेदी दिसून आली. त्यामुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने काहीशी घसरण घेत ७३.२९ रुपयांवर मूल्य कमावले.
सोने: आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डच्या दरात घसरण झाल्यानंतर सोन्याचे दर १ % नी घसरले व ५०,००० रुपये प्रति १० ग्राम एवढी एमसीएक्सवर नोंद झाली.
जागतिक बाजार: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याच्या आशेने अमेरिकी स्टॉक्समध्ये वृद्धी दिसून आली. जगभरातक कोव्हिड-१९ चे रुग्ण वाढत असले तरीही जागतिक बाजार हिरव्या रंगात स्थिरावला. नॅसडॅक अपवादात्मक स्थिती होती, तिचे शेअर्स २.२२% नी घसरले. इतर जागतिक निर्देशांक उच्चांकी स्थितीत राहिले. निक्केई २२५ चे शेअर्स १.२३% नी वाढले. हँगसेंगचे १.३२%, एफटीएसई १०० चे ०.८३% नी आणि एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.७८% नी वाढलेले दिसून आले.

 304 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.